मृत्यूनंतर मृतदेहला एकटे का सोडले जात नाही ? – गरुड पुराण

0
1324

नमस्कार मित्रानो

मित्रांनो, दिवसा नंतर रात्र होणे हे जसे निश्चित आहे, त्याच प्रमाणे जो जन्माला आला त्याचा मृत्यू सुद्धा निश्चित आहे. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मरावच लागते. म्हणजेच, जर पृथ्वीवर सर्वात मोठे सत्य आहे ते म्हणजे मरण. परंतु मित्रानो असे काही लोक आहेत ज्यांना हे सत्य स्वीकारायचे नसते.

मित्रानो तुम्हा सर्वांना माहित असेलच की हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृत शरीराला जाळले जाते. काही जणांना हे देखील माहित असेल की जर सूर्यास्तानंतर कोणी मरण पावले तर दुसऱ्या दिवशी त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

तुम्ही आजवर पाहिले असेल कि संध्याकाळनंतर जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाला एकटे सोडले जात नाही. पण मित्रानो तुम्हाला हे माहित आहे का कि मृतदेह रात्रभर एकटे का सोडले जात नाहीत ? या बाबत सविस्तर माहिती गरुडपुराणात दिली गेली आहे. ती आज आपण जाणून घेऊया.

मित्रांनो हिंदू धर्मात जर कोणी सूर्यास्तानंतर मरण पावला तर तो मृतदेह रात्रभर घरी ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. या व्यतिरिक्त, जर पंचक काळात कोणी मरण पावले, तर त्याचा मृतदेह देखील काही काळ घरी ठेवला जातो आणि जेव्हा पंचक कालावधी संपतो तेव्हा त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात कारण गरुड पुराणात सांगितले आहे की जर सूर्यास्तानंतर, किंवा जर पंचक काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले तर त्यानंतर त्याला मोक्ष मिळत नाही.

जर रात्री कोणाचा मृत्यू झाला तर अशा स्थितीत मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जात नाहीत तो मृतदेह घरातच ठेवतात , आणि विधी करण्यासाठी सकाळची वाट पाहिली जाते. अशा स्थितीत मृतदेह एका क्षणासाठी एकटा सोडला जात नाही. मृतदेहा शेजारी सतत कोणीतरी असतेच.

मृतदेह एकटा न सोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जर मृतदेह एकटा सोडला गेला तर कुत्रे आणि मांजरांसारखे प्राणी त्या मृतदेहाला यातना देऊ शकतात. गरुडपुराणानुसार यमलोकात सुद्धा मग या देहाला मरण यातना सहन कराव्या लागतात.

सोबतच अशी देखील मान्यता आहे कि मृतदेह एकटा सोडला गेला तर त्याला वास येऊ लागतो, अशा स्थितीत आवश्यक आहे की काही व्यक्ती तिथे बसून मृतदेहा भोवती धूप , अगर अगरबत्ती लावत राहावी जेणेकरून शरीरातून येणारी दुर्गंधी पसरू नये.

मित्रानो गरुडपुराणात असा देखील उल्लेख आहे कि सूर्यास्तानंतर जर मृतदेह जाळला जातो, म्हणजेच त्यावर अंत्यसंस्कार केले गेले असतील तर तो मृत आत्मा असुर, राक्षस किंवा पिशाच यांच्या योनीत जन्म घेतो, जिथे त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. हेच कारण आहे की हिंदू धर्मात रात्री अंतिम संस्कार करण्यास मनाई आहे.

गरुड पुराणानुसार जर मृतदेह रात्री एकटाच राहिला तर त्याच्याभोवती भटकणारी एखादी दुष्ट आत्मा त्या शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे मृत व्यक्तीला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

वरील लेख हा सर्वसामान्य आणि पुराणांतील माहितीवर आधारित असून आम्ही या विचारांशी सहमत आहोत असे नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. कृपया वाचकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here