नमस्कार मित्रानो
मित्रानो येत्या सात दिवसांमध्ये तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळणार आहे. आपल्याच घरात कुत्रा देखील वाघाप्रमाणे असतो याची तुम्हाला प्रचीती येईल. आजची ही माहिती अत्यंत खास आहे आणि ग्रह गोचर यांच्यावर आधारित आहे. येते काही दिवस सूर्य आणि गुरु कुंभ राशीत आहेत.
केतू वृश्चिक राशीत आहेत. चंद्रमा मेष राशी मध्ये संचार करत आहेत. या ग्रहस्थितीचा वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या पैलूंमध्ये कसा फरक पडणार आहे याबद्दल माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
लक्षात ठेवा जीवनात कोणत्याही प्रकारची परिस्थिती असेल तरीदेखील तुम्हाला फक्त चालत राहायचे आहे. फळांची अपेक्षा न करता आपले काम व्यवस्थितपणे करत राहिल्यास एक ना एक दिवस तुम्हाला आयुष्यात यश नक्कीच लाभते.
मनुष्य वेळेचा सदुपयोग कधीच करत नाही. वेळेचे व्यवस्थित नियोजन केले असल्यास तुम्ही आयुष्यात कधीच हरु शकत नाही. येत्या काही दिवसात तुम्हाला परिस्थिती सोबत ताळमेळ बसवून जुळवून घ्यावे लागणार आहे.
येत्या काही काळामध्ये परिस्थिती बिघडू शकते अशात तुम्हाला पाण्याप्रमाणे प्रत्येक भांड्यात असताना आकार बदलणे जमले पाहिजे. आवाहन तर त्या गोष्टी मध्ये आहे जे काम तुम्हाला कठीण वाटते.
अशाच कामांमध्ये ऊर्जा दिल्याने तुमचे प्रमोशन नक्की होईल. कार्यामध्ये शीघ्र सफलता मिळवायची असल्यास तुमचा अहंकार तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल. आपल्यापेक्षा लहानांची देखील मदत घ्यावी लागेल.
कार्यक्षेत्रामध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या समोर आपली कमजोरी दर्शवू नका. अन्यथा लोक त्याचा फायदा उचलतील आणि तुमचे नुकसान होईल. या सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानक घराचे काही कामं निघू शकते. यामुळे खर्च वाढतील.
भूमि संबंधी व्यवहार करताना आपल्या शुभचिंतक आणि मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यवहारातील मोठे निर्णय असमंजसपणे घेऊ नका. मोठे व्यवहार असतील तर ते तूर्तास पुढे ढकला.
गोड बोलणाऱ्या व्यक्तींपासून थोडे सावधान राहा. कोणावरही अंध विश्वास ठेवू नका अन्यथा याचा फटका तुम्हाला भविष्यात बसू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना थोडी अजून वाट पहावी लागू शकते. परंतु वाट पाहून मिळणारे फळ अधिक चांगले असेल.
नोकरी करणाऱ्यांवर कामाचा दबाव राहील. या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या गुप्त शत्रुंपासून देखील सावधान राहा. जवळच्या थोड्या फायद्याच्या विचाराने मोठी गुंतवणूक करणं टाळा. अन्यथा नजीकच्या भविष्यात तुम्हाला पस्तावावे लागेल.
या दरम्यानच्या काळामध्ये स्वास्थ संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. जुने आजार डोके वर काढतील. यासाठी तुम्हाला अत्यंत जागरूक राहायचे आहे. इष्ट मित्र जीवनात अत्यंत जरुरी असतात परंतु असे नव्हे की जे गरजेपुरतं गोड बोलतात. या जगातील मित्र हे एकच नातं आपण मनाने निवडू शकतो.
चांगलया मित्रांसोबत जीवन जगाल तर प्रगतीच्या दिशेकडे जाल. नेहमी संगत चांगली ठेवा. संतानकडून आनंद वार्ता मिळेल. घरात मंगलकार्य संभवते. एक गोष्ट लक्षात ठेवा आपण मस्करीत बोललेली गोष्ट कोणाचा अपमान तर करत नाही ना याची खबरदारी घ्यावी.
कोर्टकचेरी संबंधित गोष्टी कोर्टा बाहेरच मिटवण्याचा प्रयत्न करा. सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला दररोज जल, लाल फुलं, गंध अक्षदा अर्पित करा. व ‘ॐ सूर्याय नमः ‘ याचा अकरा वेळा मंत्र उच्चार करा.. आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ लागतील तसेच आत्मविश्वास वाढेल. शुभं भवतु!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.