14 जून वटपौर्णिमा…महिलांनी चुकून सुद्धा घालू नका या रंगाची साडी. सत्यानाश होईल.

0
29048

नमस्कार मित्रानो

मित्रानो १४ जून मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून व्रत करत असतात.

मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी या दिवशी चुकून सुद्धा करू नयेत. नाहीतर त्यांच्या उपवासाच , त्यांच्या व्रताचं पूर्ण फळ त्यांना प्राप्त होत नाही. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी बाहेर जाऊन वडाची पूजा करणे शक्य होत नाही त्या महिला वडाची फांदी घरी घेऊन येतात.

फांदी घरी आणून त्याची पूजा करतात. मित्रानो हि अत्यंत चुकीची पद्धत आहे. कारण आपल्या हिंदू संस्कृती मध्ये निसर्गाचं जतन करायला सांगितलेले आहे निसर्गाचा ऱ्हास करायला नाही.

शास्त्रामध्ये वडाच्या झाडाला पवित्र मानल गेलं आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त काळ टिकणारा हा वटवृक्ष आहे. त्यामुळे वटपौर्णिमेस आपण या झाडाची फांदी न तोडता बाहेर जाऊन जिथे वडाचं झाड आहे तिथे जाऊन त्याची विधिवत पूजा करायची आहे.

जर तुम्हाला बाहेर जाण अगदीच शक्य नसेल तर तुम्ही वडाच रोप आणू शकता ते रोप आपल्या घरातील कुंडीत लावून त्याची पूजा करू शकता. पूजा झाल्यावर तुम्हाला ते रोपटं घरात किंवा घरा जवळ ठेवणं शक्य नसेल तर बाहेर कुठेही योग्य जागेत या रोपाची लागवड करू शकता.

मित्रानो लक्षात घ्या वडाच्या झाडाची फांदी तोडून आपल्या घरी आणून त्याची पूजा करू नका. यामुळे कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही. या व्रताचं , उपवासाच कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी घालू नये. यासोबत पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा या दिवशी महिलांनी परिधान करू नयेत.

या दिवशी शरीर शुद्ध करणारच आहोत सोबतच मनाची शुद्धी देखील करायची आहे. आपण या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नयेत. बारीक पाहता कधीच वाईट विचार मनात आणूं नयेत. एखाद्याच वाईट व्हावं अशी भावना मनात आणू नये.

परंतु खासकरून या दिवशी आपण कोणाला अपशब्द बोलू नयेत , कोणाची निंदा करू नये , वडीलधाऱ्यांना अपमानित करू नये , त्यांचा अनादर करू नये. घरातील पुरुषांनी सुद्धा या दिवशी काळजी घ्यायची आहे कि महिलांना अपशब्द बोलू नये ,त्यांचा अपमान करू नये.

तस तर कोणत्याच दिवशी महिलांचा अपमान करू नये. कारण महिलांना साक्षात लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचा अनादर करू नये, तिला वाईट शब्द बोलू नयेत.

तर मित्रानो या होत्या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण वटपौर्णिमेस चुकून सुद्धा करू नयेत. जर आपण या नियमांच पालन केलं , या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल.

आपल्या घरात सुख , समृद्धी आणि शांती नांदेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव बरसत राहील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here