नमस्कार मित्रानो
15 जानेवारी रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत. मित्रांनो या मकर संक्रांतीला सूर्यदेवाच्या पूजनाच, स्नान – दानाच खूप महत्त्व आहे. आणि यामुळेच आज आपण मकर संक्रांतीला केले जाणारे काही विशेष उपाय पाहणार आहोत.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. तसेच आपल्या कुंडलीमध्ये जर शनी दोष असेल , शनीची साडेसाती असेल , धैया असेल , महादशा असेल तर शनि दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा या दिवशी आपण काही उपाय नक्की करू शकतो.
शास्त्रानुसार मकर संक्रांतीला तिळाचा अधिक अधिक प्रयोग करावा. तीळयुक्त जलाने पितरांना तर्पण करा व अग्नी मध्ये तीळ टाकून हवन करावं. तीळ खावेत , तीळ दान करावेत. या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकावेत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी.
याचबरोबर आंघोळीच्या आधी तिळाचे उटणे लावून मग आंघोळ केल्याने सर्व पापांचा नाश होतो. मकरसंक्रांतीला जर आपण गोरगरिबांना अन्नदान केलं , तिळाचं गुळाचं दान केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही.
आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते. आता जाणून घेऊया आजचा विशेष उपाय. मित्रांनो हा उपाय केल्याने आपलया कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होतो आणि ज्यांच्या कुंडलीत सूर्यग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला सर्व कार्यामध्ये सफलता निश्चित मिळते.
समाजामध्ये मान-सन्मान मिळतो. त्या व्यक्तीने कोणतेही कार्य हाती घेतलं तर त्यामध्ये त्यांना अपयश कधीच येत नाही. याचबरोबर अनेक शुभ फळांची प्राप्ती होते. चला तर जाणून घेऊया हा उपाय नक्की कसा करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांब्याच्या धातूपासून बनलेला एक शिक्का घ्यायचा आहे. तांब्याचा शिक्का नसेल तर तुम्ही तांबे या धातूचा एखादा तुकडा देखील घेऊ शकता.
तर असा तांब्याचा शिक्का घेऊन वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे. नदी असेल एखादा पाट असेल त्या ठिकाणी जायचा आहे किंवा जर नदी आणि समुद्र नसेल तर एखाद्या तलावात तुम्ही काय करू शकता.
तर हा तांब्याचा शिक्का या तलावांमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. सोबतच थोडेसे काळे तीळ सुद्धा प्रवाहित करायचे आहेत. तीळ आणि तांब्याचा शिक्का प्रवाहित करताना ओम घृणि सूर्याय नमः हा मंत्र सात वेळा बोलायचा आहे.
आता हाथ जोडून आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे , मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे. आपल्या जीवनातील दुःख , समस्या , गरिबी , दरिद्रता कायमची नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी दिवस भरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त सूर्यास्त होण्याआधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर शक्य असेल तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा उपाय केला तर अति उत्तम.
मित्रानो आपण जे काही उपाय करतो त्यावेळी कोणतीही शंका , कुशंका मनात आणू नका. आपला उपाय सिद्ध होईल कि नाही , आपली मनोकामना पूर्ण होईल कि नाही अशी कोणतीही शंका मनात आणू नका. पूर्ण श्रद्धने , विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे.या उपायांचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.