नमस्कार मित्रांनो
मित्रांनो आज आपण वृषभ राशिच्या पत्नी बद्दल माहिती घेणार आहोत. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व नेमक कशा प्रकारच असत, त्यांचे राहणीमान कशा प्रकारच असत, बोलण कशा प्रकारच असत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, त्यांच्या अपेक्षा कोणत्या प्रकारच्या असतात.
अशी कोणती गोष्ट आहे की जी त्यांच्या बाबतीत जाणून घेणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, या सर्व संदर्भातले खुलासे आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीची जी पत्नी आहे तिच संपूर्ण व्यक्तिमत्त्व कशा प्रकारचे असते.
वृषभ रास ही द्वितीय स्थानात येणारी रास आहे. स्त्री रास आहे व या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे तत्व हे पृथ्वी तत्व आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नजरेत भरण्यासारखी आहे ती म्हणजे त्यांचा हसत मुख चेहरा. त्यांचा हसरा चेहरा, गोड मधुर भाषणी हा भाग वृषभ राशीच्या पत्नी मध्ये दिसून येतो.
त्यामुळे आपल बोलण अगदी व्यवस्थित हसत मुखपणे सांगणं हे या राशीला खूप चांगलं जमतं. म्हणजे विषय कितीही गंभीर असेल, कितीही गुंतागुंतीचा असेल किंवा कितीही टेन्शन येणारा असेल तरी आपला मुद्दा अगदी व्यवस्थितपणे समोरच्या पुढे ठेवण हे यांना खूप चांगल जमत. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी समोरच्या ला अगदी सहजपणे समजतात आणि बऱ्याच वेळेला पटतात सुद्धा.
त्यामुळे आपले जे लाड आहेत ते आपल्या पतीकडे पूर्ण करून घेण्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाची ही रास आहे. म्हणजे होत असं की आपण आपली गोष्ट अगदी व्यवस्थितपणे दुसऱ्याला समजून सांगितली आणि त्याला ती समजली तर ती गोष्ट करायला समोरची व्यक्ती तयार होते. तर ही गोष्ट या राशीच्या स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे जमते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान. यांच राहणीमान अगदी व्यवस्थित, नीटनेटक आणि टापटीप असत. या फॅशनेबल असतात पण यांची फॅशन ही जास्त डार्क दिसत नाही, सोबर फॅशन असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फॅशन तुम्हाला कॅरी करता आली पाहिजे, फॅशन कॅरी करणे या राशीच्या स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे जमत.
यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आकर्षक असत. लोकांना त्यांच्याशी बोलावं वाटतं, यांच्याबद्दल इमेज खूप चांगली असते. रडतराऊपणा या राशींच्या पत्निमध्ये दिसून येत नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे पत्नीच्या संदर्भात स्त्रियांच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी या स्त्रियांमध्ये दिसून येतात.
आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे व्यवहारीपणा. या राशींच्या स्त्रियांमध्ये व्यवहारीपणा खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो पैसे कुठे कधी कसे खर्च करायला पाहिजे याची सुद्धा बुद्धी या राशींच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. पैसे वायफळ खर्च करणार नाहीत. एकच गोष्ट घेण्याकरता दहा दुकानांमध्ये फिरतील आणि नंतर खरेदी करतील.
एखादी वस्तू घेताना त्या वस्तू बद्दल हा विचार करतील की ही वस्तू घेतल्यानंतर आपल्याला याचा उपयोग पुढच्या आयुष्यात किती आहे. या राशीमध्ये लॅव्हिश लाईफस्टाईल दिसली तरी पैसे मात्र वायफळ खर्च करणार नाहीत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.
मगाशी सांगितल्या प्रमाणे त्यांचं बोलणं, त्यांचं राहणीमान आणि त्यांचा हाच स्वभाव खूप चांगला आहे. मग घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात मग सांगायचं झालं तर ते मात्र त्यांना तेवढंस जमत नाही. म्हणजे त्याबद्दल खूप ओढीने काम करणे यांना जमत नाही किंवा त्यांना ते तेवढं आवडत नाही.
म्हणजे घरी जेवण बनवण्यापेक्षा बाहेरून काहीतरी चटपटीत आणून खाणं हे या राशीच्या स्त्रियांना आवडत. अर्थात घरातील काम करतीलच पण ती आवड मात्र त्यांची तशी दिसून येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गाण्याची, संगीताची किंवा सिनेमाची यांना चांगली आवड असते.
लक्षात घ्या वृषभ राशीच्या स्त्रिया असतात त्या कमीत कमी बाथरूम सिंगर तरी तुम्हाला दिसून येतील. त्यांचे जे सौंदर्य असते ते त्यांच्या डोळ्यांमध्ये असतं, हसण्यामध्ये असत, चेहऱ्यामध्ये असत आवाजामध्ये असत. आवाजाचा कंप असतो तो सुध्दा अतिशय नाजूक आणि दिलखेच अशा प्रकारचा दिसून येत.
तर एकंदरीत वृषभ राशीच्या पत्नीचे व्यक्तिमत्त्व हे साधारणत आकर्षक अशा स्वरूपाचं असतं. वृषभ राशी मध्ये तीन नक्षत्र येतात कृतिका, रोहिणी आणि मृग. कृत्तिका नक्षत्र हे थोडस तिखट आहे, या नक्षत्रात वाणी वगैरे चांगली असते परंतु कधीकधी यांचं बोलण थोड धारदार टोकदार असू शकत. आपल्या मतावर ठाम राहण, आपल्या मताशी तडजोड न करण हे वृषभ राशीच्या स्त्रियांमध्ये साधारणत दिसून येते.
परंतु या नक्षत्राची आणखी एक खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजे यांच्या करीयरच्या बाबतीत हे खूप पुढे जातात. स्वतच्या हिमतीवर पुढे जाण्याची धमक यांच्यात असते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट संपूर्ण वृषभ राशीच्या स्त्रियांना किंवा पत्नीला लागू होते.
रोहिणी नक्षत्रा बद्दल सांगायचं झालं तर रोहिणी नक्षत्र हे लाड पुरवून घ्यायला जन्माला आलेला आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही कारण बालपणापासून त्यांचे लाड होतात किंवा त्यांचे लाड पुरवले जातात त्यामुळे त्यांचा स्वभाव सुद्धा तसाच असतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा साधारणतः तसा असतो.
मजा करायची, आनंद घ्यायचा जीवनाचा त्यामुळे या नेहमी पॉजीटीव्ह असतात. जीवनात मजा घ्यायची म्हणजे नुसते पैसे खर्च करायचे असा भाग नाही परंतु प्रत्येक नातेसंबंधांकडे किंवा जीवनाकडे पाहण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे हा रोहिणी नक्षत्र मध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो.
भौतिक सुखांची आवड या नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. भौतिक सुख म्हणजे दाग दागिने किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत लॅव्हिश लाइफस्टाइल संबंधित त्याची त्यांना आवड असते आणि नशिबाने त्यांना त्या मिळतात सुद्धा. तर रोहिणी नक्षत्र मध्ये हा जो भाग आहे हा भाग चांगला दिसून येतो.
मृग नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर मृग नक्षत्राच्या स्त्रिया किंवा पत्नी ही थोडीशी सावध असते. कुठलही काम करायचं असेल तर त्याचा सांगोपांग विचार करून त्यावर निर्णय घ्यायचा आणि ते पूर्ण करून दाखवायचं. लक्षात घ्या मृग नक्षत्राची जी पत्नी आहे त्यांनी घेतलेले निर्णय हे सहसा चुकत नाही. यांना वाचनाची खूप आवड असते वाचनाची आवड असल्यामुळे त्यांच ज्ञान हे खूप चांगलं असत.
अर्थात कम्युनिकेशन स्किल खूप चांगल असत. कुठे, कधी, कस बोलायचं हे त्यांना चांगल माहिती असते. शाब्दिक कोट्या करणं हे या राशीच्या पत्नीला खूप चांगल्या प्रकारे जमत. तर एकंदरीत पाहायचं झालं तर वृषभ राशीची पत्नी आहे तिला तुम्ही नीट समजून घेतलं तर कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत.
वृषभ राशीची पत्नी जर का गृहिणी असेल तर गृहिणी व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्कम साठी काही ना काही तरी काम करतील म्हणजे पैशाचे त्यांना मोल चांगलं माहिती असतं त्यामुळे घरात राहूनच घरात बसून सुद्धा कुठलं ना कुठल काम करतील जेणेकरून आर्थिक इन्कम काहीतरी व्हायला हव आणि त्या करता ते नेहमी कार्यरत राहतात. तशा प्रकारची दृष्टी ही वृषभ राशीच्या पत्नीमध्ये दिसून येते.
हे सगळे चांगले गुणधर्म झाले परंतु एखाद्या राशीमध्ये किंवा कुठल्याही राशीमध्ये सगळेच काही चांगले गुण असतील असं नाही मगाशी जो एक गुणधर्म सांगितला आपल्या मतावर ठाम राहण, आपल्या मताशी तडजोड न करण आणि थोडसं अहंकाराचा भाग या राशीमध्ये दिसून येतो.
अर्थात हा लगेचच्या लगेच किंवा हायलाईट होणारा किंवा महत्त्वाचा भाग आहे असं मात्र नाही कारण बरेचसे चांगले गुणधर्म असल्या कारणामुळे हा जो गुण आहे हा त्यांच्या अगदी जवळ राहणाऱ्या व्यक्तीना, खासकरून यांच्या पतीला ठाऊक असतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.