नमस्कार मित्रांनो,
मित्रानो कधी कधी आपल्या जीवनात सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित चाललेल्या असतात. आपण खूप खुष असतो आपल्याला वाटत असते की थोड्याच दिवसात आपण सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो पण आपल्या जीवनात अचानक असे वळण येते की आपलं सर्व काही उध्वस्त होते.
अचानक एखादी गोष्ट आपल्या जीवनात समस्या निर्माण करते. काम धंद्यात अचानक नुकसान होते किंवा एखादा माणूस निरोगी- तंदुरुस्त आहे पण अचानकपणे तो खाणे पिणे सोडून देतो किंवा तो सारखा आजारी पडत आहे आणि औषधांचाही काही परिणाम होत नाहीये.
तर अशा प्रकारच्या घटना तुमच्या जीवनात सुद्धा घडत असतील. काही वेळा अस होत की आपण एखादे काम करण्याची इच्छा ठेवतो पण ते काम करण्यास आपले मन होत नाही या सगळ्या मागचे कारण तर एकच आहे आपल्याला कोणाची तरी नजर लागलेली आहे.
मित्रानो सर्वात तुमचीच चूक असते. कशी ते माहिती करून घेऊया. या दुनियेत तीन प्रकारच्या ऊर्जा असतात. सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आणि विरोधात्मक ऊर्जा. ज्या व्यक्तीचे विचार, बोलणे आणि कर्म चांगले असतात ते सकारात्मक ऊर्जेच्या श्रेणी मध्ये येतात.
म्हणजे हा व्यक्ती ज्या कोणाशी बोलेल त्याचे जीवन बदलून टाकेल, त्यांना पूर्णपणे पोजिटिव्ह बनवेल. पण ज्या व्यक्तीचे विचार, वागणे, कर्म चांगले नसतात ते नकारात्मक ऊर्जेच्या श्रेणी मध्ये येतात म्हणजेच तो व्यक्ती जर कोणाशी बोलला तर त्या व्यक्तीवर समस्या यायला सुरुवात होईल
आपल्यासोबतही असच होत, पण अस का होतं? जेव्हा आपण आपल्या तोंडाने बढाया मारतो, काही वेळा आपण आपल्या भविष्याचे प्लॅन ही दुसर्यांना सांगतो पण जर एखादी व्यक्ती नकारात्मक विचार करत असेल तर अशी व्यक्ती तुमच्याकडे नकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते.
त्यामुळे नकारात्मक गोष्टी घडतात. काम बिघडतात, काम पूर्ण होत नाहीत, अचानक आजारी पडणे आणि हे सगळे नजर दोष आहेत. यामध्ये कुठेना कुठे तुमचीच चूक आहे. जे झालं ते झालं पण ईथुनपुढे तुम्ही ही सवय बंद करा.
हे जे झालं आहे ते कसं टाळायचं? यासाठी एक चमत्कारिक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घरात जर अशुभ घटना घडत असतील तर याचे कारण नजर दोषच आहे यापासून वाचण्यासाठी उपाय आहेत आणि हे उपाय तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणतील.
जेव्हा घरात एखादे लहान बाळ रडत असेल आणि ते रडायचे थांबतच नसेल तर सुख्या लाल मिरच्या, मोहरीचे दाणे आणि काळे मीठ घ्या आणि बाळाचे तोंड दक्षिण दिशेला करा व दृष्ट काढा त्यानंतर एक तवा घ्या आणि त्यामध्ये टाका अस केल्याने बाळ रडायचे बंद होईल.
जेव्हा एखादी व्यक्ती खुप चीडचीड करते, त्यांना भूक लागत नाही किंवा त्यांचे कामात मन लागत नाही अशा लोकांवरही नजर दोषच असतो.
यातून बाहेर पडण्यासाठी थोडेसे सैंधव मीठ आपल्यावरून दक्षिण दिशेला व उलट्या दिशेला फिरवा आणि त्याला एक ग्लास पाण्यामध्ये टाका. पुराणानुसार जेव्हा पाण्यात मीठ मिक्स होते तेव्हा वाईट नजर दोष दूर होतो आणि त्याचा परिणाम कमी होतो.
जर तुमच्या घरात एखादा व्यक्ती जास्त काळापासून आजारी असेल व बरा होत नसेल तर तुम्हाला आसपासचे समुद्र, तलाव किंवा नदीचे पाणी एका बाटलीमध्ये घ्यायचे आहे आणि मंगळवारी पांढऱ्या कापडात पाणी घेऊन संपूर्ण घरात ते पाणी शिंपडायचे आहे. अस करू शकत नसाल तर नारळाची शेंडी घरामध्ये जाळा आजारपणापासून सुटका मिळेल.
व्यापारात पूर्ण मन लावून ही यश मिळत नसेल तर याचे कारण ही नजर लागणे असू शकते. जिथंही तुम्ही काम करत असाल तिथे पाण्याच्या ग्लास मध्ये लिंबू ठेवा यामुळे तुम्हाला नजर लागणार नाही. भरलेल्या ग्लास मध्ये एकच लिंबू ठेवायचा आहे आणि शनिवारी हा लिंबू बदलून जुना लिंबू वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.