नमस्कार मित्रांनो
मित्रानो आज आपण याबद्दल माहिती घेऊया की वृश्चिक राशीचे प्रेम कसे असते. वृश्चिक राशीच्या व्यक्ती प्रेमात असतील तर काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे काय करावे, काय करणे टाळावे किंवा वृश्चिक राशीच्या व्यक्तीला अप्रोच करायच असेल तर कसे करावे.
मित्रान वृश्चिक राशी ही आठव्या क्रमांकाची रास आहे, या राशीचा स्वामी हा मंगळ आहे, स्त्री राशी आहे आणि या राशीचे तत्व हे जलतत्व आहे. ही रास गुप्तता राखणारी रास आहे.
आपल्या मनात असणाऱ्या गोष्टी या समोरच्याला कधीच कळू देत नाहीत. यांच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी खूप असते. यांच्या चेहऱ्यावरून हे किती हार्ड वर्क करू शकतात हे समजत नाही.
धैर्यवान अशी ही रास आहे, या राशिकडे उत्तम करेज असतं. कोणतीही गोष्ट करण्यासाठी जे धैर्य लागत ते या राशीमध्ये उत्तम प्रकारचे असते. यांच्याकडे व्हिजन चांगल्या प्रकारचे असते.
कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी जे व्हिजन लागत ते या राशिकडे चांगले असते. महत्वकांक्षी अशी ही रास आहे. हे सर्व गुणधर्म आयुष्य स्थावर करण्यासाठी लागतात. अतिशय डेरिंग बाज अशी हि रास आहे.
या राशीचे लोक सहसा कोणाला घाबरत नाहीत, मग ते परिस्थिती असो किंवा व्यक्ती. एवढे चांगले गुण असूनही तुम्हाला या गोष्टीचा पत्ता लागत नाही की तुमच्यात एवढे चांगले गुण आहेत.
ही रास सहसा कोणावर विश्वास ठेवत नाही, त्यांच्या पद्धतीने ते तुमची पडताळणी करतील आणि मगच विश्वास ठेवतील. अतिशय भावनाशील अशी ही रास आहे, प्रथम दर्शनी तुम्हाला अस वाटणार नाही की या व्यक्ती भावनाशील आहेत पण हे लोक भावनाशील असतात.
यांच्या भावना या खूप टोकाच्या किंवा तिखट असतात. आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये येणार असाल तर. या व्यक्ती जर कोणावर विश्वास ठेवत असतील तर ते त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी यांची असते.
वृश्चिक रास भावनाशील असली तरी यांच्या ज्या भावना असतात त्या अत्यंत तिखट असतात किंवा टोकाच्या म्हणायला हरकत नाही. ही रास कधीही अपमान विसरत नाही.
एखादी व्यक्ती आवडली तर त्या व्यक्तीसाठी काहीही करायला या राशीचे लोक तयार होतात परंतु एखादी व्यक्तीने धोका दिला , फसवलं तर त्यांना मात्र या राशीचे लोक डंक मारल्याशिवाय राहत नाहीत.
समजा एखाद्या दुकानात गेलात किंवा हॉटेल मध्ये गेलात आणि तिथे सर्व्हिस नीट भेटली नाही तर पुन्हा त्या दुकानात कधीच जाणार नाही. गोष्टी साध्या आणि सोप्याच असतात परंतु यांच्या बरोबर लक्षात राहतात.
यांचा कोणी अपमान केला तर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. स्वतःचा वेळ घेऊन मगच त्याला प्रतिउत्तर देतात. झालेला अपमान हे लोक कधीच विसरत नाहीत. या राशीच्या लोकांना ट्रान्सपरंसी खूप आवडते.
या लोकांना राग आला तरी ते लगेच दाखवत नाहीत, संधीची वाट बघत असतात आणि एकदा जर राग आला तर मनातले सगळे बोलून टाकतात. तस पाहिलं तर जीवाला जीव देणारी ही रास आहे.
एकदा जर का यांचा विश्वास बसला तर कधीही, काहीही करायला हे रेडी असतात. या राशीचे लोक हे दिसायला सुंदर असतात. वृश्चिक राशीच्या लोकांच्या जर प्रेमात असाल तर यांचे डेडिकेशन तुम्हाला दिसून येईल.
तुम्ही जसे आहात तसेच जर वागलात तर यांना खटकणार नाही परंतु तुमचा स्वभाव वेगळाच आहे आणि यांचे प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध वागत आहात आणि हे जर त्यांना कळले तर कधीच तुमच्या जवळ येणार नाहीत.
एकदा का तुमची यांचा विश्वास गमवून बसलात तर मग काहीही करा पुन्हा तुमच्यावर या राशीचे लोक विश्वास ठेवणार नाहीत. तुम्हाला जर त्यांच्याकडून होकार मिळवायचा असेल तर नात्यात पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे.
जे तुम्ही आहात तसेच तुम्ही वागा आणि हो… वृश्चिक राशीचे लोक क्रॉस चेक देखील करतात कि जे तुम्ही बोलताय , वागताय , राहताय तसेच तुम्ही आहात का ? जेव्हा त्यांना कळत कि तुम्ही जे बोललात ते खरंच आहे , मग त्या नंतरच हे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.