नमस्कार मित्रांनो
मित्रानो तुम्ही श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी लपून खा ही एक लहान वस्तू. तुमच्याकडे धनाची कमी कधीच होणार नाही. आज आम्ही तुम्हाला श्रावणात काय खाल्ले जाते आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहिले [पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.
श्रावणात भगवान शिव यांची आराधना केली जाते, प्रत्येकजण व्रत करतो कोणी एक दिवसाचा तर कोणी 30 दिवसांचा. श्रावणातील या उपवासात आपण काय खाल्ले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे याविषयी माहिती करून घेणे खूप महत्वाचे आहे.
श्रावणात कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत
शिंगाड्याचे पीठ : याचे महत्व शास्त्रात सांगितले आहे. यापासून बनवलेले पुरी किंवा यापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमचे व्रत ही तुटणार नाही आणि तुम्हाला लाभ ही मिळेल. याला पूर्णपणे सात्विक अन्न म्हणतात.
श्रावणातील उपवासात शिंगड्याच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे तुम्हाला सेवन करायचेच आहे. बदलत्या वातावरणामध्ये आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे फायदेशीर आहे कारण यामध्ये असे काही पोषकतत्व आहेत जे व्रत केल्यावर शरीराला काही प्रकारचे लाभ देतात.
तुम्ही शींगड्याच्या पिठाचे बर्फी, हलवा, पुरी काहीही बनवू शकता. पण श्रावण महिन्यात हे लक्षात ठेवा की शिंगाड्याच्या पिठाचे सेवन नक्की करा.
साबुदाणे : श्रावणातील सोमवारी तुम्ही साबुदाण्या पासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता कारण आरोग्यासाठी ते फायदेशीर असतात. उपवास असताना साबुदाणे खाल्ल्याने आपल्याला एनर्जी मिळते. याचे तुम्ही खीर, खिचडी, वडा असे पदार्थ बनवू शकता.
ड्रायफ्रुटस : श्रावण महिन्यात जर तुम्ही पूर्ण 30 दिवसांचे व्रत ठेवत असाल तर हे ड्रायफ्रुटस खूप फायदेशीर ठरणार आहेत. ड्रायफ्रुटस हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात शिवाय जे ग्रह गोचर आहेत किंवा ग्रहाची स्थिती बनलेली आहे त्यासाठी हे खूप चांगले आहे आणि योग्य दिशेला घेऊन जाणारे आहेत.
त्यामुळे मूठभर ड्रायफ्रुटस नक्की खा. उपवास केल्यावर व्यक्ती फलाहार नक्की करतो तर तुम्ही केळी, सफरचंद, डाळिंब हे खा.
कोणते पदार्थ खाऊ नयेत
कारण हे पदार्थ खाल्ल्याने पूजा पूर्ण होत नाही व त्याचे योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही.
दूध : श्रावण महिन्यात आपल्याला दूध प्यायचे नाही. श्रावण महिन्यात चाऱ्यावर सूक्ष्म किडे, जंतू बसलेले असतात आणि हेच गाय किंवा म्हैस खात असतात आणि नंतर जेव्हा हे दूध येते ते यांनी भरपूर असते.
श्रावण महिन्यात भगवान शिव यांना दूध अर्पित केले जाते कारण महादेव तर समस्त विश्वाचे विष पिण्याची ताकद ठेवतात. म्हणून श्रावणात तुम्ही दूध पिऊ नका. शिव यांचा अभिषेक करा, भगवान शिव यांची तुमच्यावर कृपा बरसेल.
बटाटा, भोपळा, दुधी, पालक, मेथी, कोबी, फ्लॉवर हे पदार्थ खाऊ नका. यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण तेच आहे की यावरही सूक्ष्म जंतू असतात आणि हे पोटात गेले की आपले पोट खराब होऊ शकते.
मटण, मासे – आपण श्रावण महिन्यात पूर्णपणे शाकाहारी राहायचे आहे. श्रावण महिन्यात तामसिक अन्नापासून लांब रहा.
पान सुपारी – श्रावण महिन्यात पान सुपारी नाही खाल्ली पाहिजे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.