अस आहे वृषभ राशीचे प्रेम…

0
593

नमस्कार मित्रांनो,

आज आपण वृषभ राशीची व्यक्ती जर जर प्रेमात असेल तर त्यांची वागणूक कशी असेल याबद्दल माहिती घेऊया. वृषभ रास ही स्त्री रास आहे. या राशीचा स्वामी हा शुक्र आहे व तत्व पृथ्वी आहे. या राशीचा स्वभाव हा शांत, संयमी आणि हसरा आहे.

हार्ड वर्क करणारी ही रास आहे. या व्यक्तींना सौंदर्याची आवड असते, या राशीच्या लोकांचं बोलणं सुद्धा छान असतं. वृषभ राशीचे लोक कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करतात व मगच ते काम हाती घेतात.

एकदा काम हाती घेतलं की संपूर्ण जिद्दीने, चिकाटीने ते काम पूर्ण करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर कामाबद्दल टेन्शन कधीच दिसत नाही. नाते संबंध टिकवण्यासाठी जो महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे भाषेवर प्रभुत्व आणि या राशीमध्ये ही गोष्ट पुरेपूर दिसून येते.

या राशीचे लोक कितीही रागावले असतील तरीही वाकडा शब्द या व्यक्तीकडून येत नाही, अतिशय शांत आणि सहजपणे बोलणारी ही रास आहे. या राशीमध्ये तीन नक्षत्र येतात कृतिका, रोहिणी आणि मृग.

यापैकी कृतिका थोडी रागीट आहे पण रोहिणी आणि मृग हे अतिशय शांत नक्षत्र आहेत. या व्यक्ती प्रॅक्टिकल आणि व्यवहारी असतात. या व्यक्तींकडे व्हिजन असते, की मला या प्रकारे गोष्टी अचिव करायच्या आहेत किंवा मिळवायच्या आहेत आणि या पद्धतीने त्यांचा प्रवास चालू होतो.

करियर च्या बाबतीत बोलायचं झालं तर जिथून ही व्यक्ती सुरुवात करते तेथून खूप उंची ही व्यक्ती गाठते. पैसे कुठे खर्च करायचे , किती करायचे या सर्व गोष्टी या राशीच्या व्यक्तीला बरोबर माहीत असतात.

या लोकांना गाण्याची आवड असते, स्वतः आनंदी राहतात. श्रवण करण्याची क्षमता या लोकांची चांगली असते. या लोकांचे राहणीमान ही अत्यंत व्यवस्थित असते म्हणजे परिस्थितीचा आणि राहणीमानाचा तसा संबंध दिसून येत नाही. परिस्थिती जेमतेम असली तरी राहणीमान अतिशय व्यवस्थित असतं.

यांचं सौन्दर्य हे तुम्हाला त्यांच्या डोळ्यात, बोलण्यात दिसून येईल. नाते संबंध टिकवण्यात ही व्यक्ती खुप चांगली असते. या व्यक्तींना खाण्या-पिण्याची खुप आवड असते. तसेच खाण्याच्या बाबतीत किंवा पाक कलेमधील यांना चांगले ज्ञान असते.

ही व्यक्ती तुम्हाला एव्हरेज उंचीची दिसेल, गळा हा थोडा जाड असतो. खाण्यापिण्याची आवड असली तरी या व्यक्ती तुम्हाला जाड दिसणार नाहीत कारण काम करण्याची कॅपॅसिटी यांची चांगली असते.

यांना आयुष्याकडून फार काही अपेक्षा नसते, म्हणजे खूप काही मोठी स्वप्ने नसतात आणि जरी असली तरी स्टेप बाय स्टेप हे स्वप्न अचिव करतात. या व्यक्ती स्वतःबद्दल फार काही बोलत नाहीत, दुसऱ्याचं ऐकून घेण्यात यांना इंटरेस्ट असतो.

या व्यक्ती सोबत जर तुमचा संबंध आला तर तुम्हाला या व्यक्ती चांगल्या वाटू लागतील. या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीची शौकीन असतात पण कोणत्याच गोष्टीत वाहत जात नाहीत. तुमचा जोडीदार जर वृषभ राशीचा असेल तर तुम्ही नेहमी आनंदी रहाल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here