नमस्कार मित्रांनो
मित्रानो वास्तू शास्त्राच्या नियमानुसार घरातील प्रत्येक गोष्टीची वास्तू योग्य असणे महत्वाचे असते. जर चुकूनही घराच्या कोणत्याही भागात वास्तू ची कमी असेल तर त्याचा परिणाम घराच्या सर्व सदस्यांवर होतो.
किचन तुमच्या घरातील सर्वात महत्वाचा भाग असतो आणि हीच ती जागा आहे जिथून तुम्हाला काम करण्यासाठी लागणारी आवश्यक ऊर्जा मिळते. आणि इथूनच तुमच्या सर्व क्रिया ठरतात.
काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून कुठे ना कुठे सुटून जातात, पण या गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत. अस म्हणतात की घराच्या आग्नेय कोपऱ्यात किचन असणे सर्वात शुभ फलदायी असते.
आग्नेय कोपरा सोडून दुसऱ्या ठिकाणी किचन बनवल्यास घरातील महिलांवर वाईट परिणाम पडू शकतो. त्याचबरोबर तुमच्या घरात अन्नाची कमी होऊ शकते. तुमचे घर बांधून झाले असेल आणि हा दोष तुम्हाला कमी करायचा असेल तर किचन मध्ये उत्तर पूर्व दिशेला सिंदूर गणेशाचा फोटो लावू शकता.
किचन मध्ये सामान ठेवण्याची दिशा फिक्स असते तुम्हाला गॅस आग्नेय कोपऱ्यात, प्लॅटफॉर्म दक्षिण पूर्व दिशेला घेरून असावा. जेवण करत असताना महिलेचे मुख पूर्व दिशेला असावे, दक्षिण दिशेला कधीच असू नये. अशाने घरातील स्त्रिया आजारी पडतात.
किचन मध्ये पिण्याचे पाणी गॅस पासून लांब अंतरावर असावे, दोन्ही एका ठिकाणी असणे खूपच दोषयुक्त असते आणि किचन मध्ये बरकत येत नाही. गॅस तुम्हाला नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवला पाहिजे.
तुमच्या किचन मधील मायक्रोवेव्ह, मिक्सर किंवा धातूचे अन्य उपकरण दक्षिण पूर्व दिशेला ठेवले पाहिजेत. फ्रीज उत्तर पूर्व दिशेला ठेवले पाहिजे. कचरापेटी किचन मधून बाहेरच ठेवली पाहिजे.
तुमचे किचन ओपन आणि चौकोनी असेल तर फरशी आणि भिंतींचा रंग पिवळा, नारंगी किंवा ग्रे ठेवा. किचन मध्ये कधीच निळा आणि आकाशी रंग लावू नका. किचन ची खिडकी पूर्व दिशेला असावी.
किचन मध्ये पूजा घर ठेऊ नका. तुमच्या घरात झुरळ, किडे फिरत असतील तर हा चिंतेचा विषय आहे, तुमची आरोग्य खराब करण्यासाठी हे एकच कारण पुरेस आहे. किचन स्वच्छ आणि सुंदर ठेवा. किचन मध्ये पूर्व दिशेला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता.
आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार किचन मधील काही दोष सांगितले आहेत त्याप्रमाणे बदल केल्यास तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.