नमस्कार मित्रानो
मित्रानो समोरची व्यक्ती पैसे परत करत नसेल तर अशावेळी आपले उधार दिलेले किंवा मदत स्वरूपात दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा तांत्रिक तोडगा आपण करू शकता. काळजी करू नका कारण हा उपाय केल्याने समोरच्या व्यक्तीला कोणतेही नुकसान अथवा इजा पोहोचत नाही.
मित्रानो हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. शक्यतो हा उपाय रात्री केलात तर अति उत्तम. उपाय करण्यासाठी आपण काही कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. थोड्याश्या जास्तच घ्या आणि या कापराच्या वड्या जाळून त्यातून जो धूर बाहेर पडेल त्या धुरावर एखाद पात्र आपण धरायच आहे.
पात्र धुराच्या वर धरल्यानंतर जी काजळी त्या पात्रावर जमा होईल त्या काजळीत तुपाचे किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत. मोहरीच्या तेलाला सरसोका तेल असे हिंदीत म्हणतात.
तेल आणि काजळी एकत्र करून त्यापासून काजळ बनवायचं आहे आणि या काजळाने तुमच्या शत्रूच , उधार दिलेल्या व्यक्तीच पहिलं नाव लिहायच आहे. वडिलांचं नाव किंवा आडनाव लिहिण्याची गरज नाही.
मित्रानो हा तोडगा पूर्ण विश्वासाने करा , पूर्ण श्रद्धेने करा. तुमचे पैसे जो बुडवू इच्छित आहे ,जो बुडवणार आहे किंवा बुडवलेले आहेत तो व्यक्ती स्वतः घरी येऊन तुमचे पैसे तुम्हाला परत करेल. फक्त पूर्ण श्रद्धा मात्र असायला हवी.
हे काजळ बनवल्या नंतर त्या व्यक्तीच नाव भोजपत्रावर लिहायचं आहे. तुमच्या आसपास मार्केट परिसरात हे भोजपत्र सहज उपलब्ध होईल. तसेच ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता. भोजपत्राला भूर्जपत्र देखील म्हटले जाते.
जर हे भोजपत्र उपलब्ध झालं नाही तर एखाद्या प्लेन कागदावर ज्यावर रेषा मारलेल्या नाहीत अशा कोऱ्या कागदावर सुद्धा आपण त्या व्यक्तीच नाव लिहू शकता.
हे नाव लिहिल्या नंतर आपण हे नाव आपल्या कपाटामध्ये , तिजोरीमध्ये किंवा एखाद्या बंदीस्त जागी ठेवायचं आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता किंवा किंमती वस्तू ठेवता.
लक्षात घ्या जर तुम्ही तुमचे पैसे एखाद्या डब्यात साठवत असाल तर त्या डब्यामध्ये हा कागद ठेवायचा आहे. कागद त्या जागी ठेवल्यानंतर त्या कागदावर एखादी जड वस्तू ठेवून द्या. कोणतीही जड वस्तू.
जेणेकरून ते नाव खाली दबल जाईल. त्यावर प्रचंड दाब पडेल अशी एखादी वस्तू ठेवा. ३ ते ४ दिवस फक्त वाट पहा तुमचे उधार दिलेले पैसे समोरचा व्यक्ती तुम्हाला नक्की परत करेल.
एक गोष्ट लक्षात असुद्या कि हा तोडगा करताना त्याची चर्चा कोठेही करू नका. म्हणजे तुम्ही हा तोडगा करणार आहात हे कृपया कोणाला सांगू नका. अन्यथा या तोडग्याचा तात्काळ प्रभाव नष्ट होतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.