श्रीकृष्ण म्हणतात रोज तुळशीपुढे हे तीन शब्द बोलल्याने दारिद्र्य दूर होते….

0
8528

नमस्कार मित्रांनो

मित्रानो ब्रह्मवैवर्तपुराण नुसार एकदा नारद मुनी आणि भगवान श्रीकृष्ण जवळ येतात आणि म्हणतात हे प्रभु तुळस ही भगवान नारायणाची प्रिय आहे म्हणून ती पवित्र आहे व ती पूजनीय ही आहे, पण तिच्या पूजनाचे विधान काय आहे आणि यांच्या स्तुती साठी कोणते स्तोत्र आहे हे मी अजुन ऐकले नाही.

हे प्रभू कोणत्या मंत्राने तुळशीची पूजा केली पाहिजे. सर्वप्रथम कोणी तुळशीची पूजा केली हे नारद यांच्या कडून विचारण्यात आल्यावर भगवान श्रीकृष्ण यांनी तुळशीच्या पूजनाचे महत्व तसेच रोज तुळशी समोर म्हणले जाणारे महामंत्र याच्याविषयी सांगितले आहे.

श्रीकृष्ण सांगत होते की, जी पण स्त्री तुळशीसमोर या मंत्राचे उच्चरण करेल ती सौभाग्यशाली बनेल. जो पण पुरुष तुळशी समोर या मंत्राचे उच्चारण करेल त्याला अक्षय धनाची प्राप्ती होईल.

ज्या घरासमोर रोज तुळशीची पूजा केली जाईल त्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास असेल. तुळशीचा हा मंत्र, मंत्रराज कल्पतरू आहे हा समस्त फळांना प्रदान करणारा आहे. जो पण तुळशीसमोर या मंत्राचा उच्चारण करेल त्याला संपूर्ण सिद्धी प्राप्त होईल.

सर्वप्रथम तुळशीची पूजा भगवान श्रीहरी विष्णू द्वारा करण्यात आली होती. तुपाचा दिवा, धूप, सिंदूर, चंदन, नैवेद्य आणि फुले हे सर्व घेऊन श्री हरीविष्णू यांनी तुळशीची पूजा केली होती.

श्रीकृष्ण म्हणतात याप्रकारे जो कोणी तुळशीची पूजा करेल त्याच्या सर्व जन्माचे पाप नष्ट होतील आणि तो व्यक्ती सुख समृद्धी प्राप्त करेल. तुळशीच्या नित्य पूजनाने व मंत्र जप केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होईल व गोलोकात जाईल.

जो व्यक्ती कार्तिक महिन्यात श्री हरी विष्णू यांना तुळशी पत्र अर्पण करतो त्याला दहा हजार गाईंच्या दानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशीच्या पूजनाने ज्याला पत्नी नाही त्याला पत्नी मिळते, ज्याला संतान नाही तो पुरुष पुत्रवान बनतो, रोगी रोगातून मुक्त होतो आणि भयभीत मनुष्य धैर्यवान बनतो, तसेच पापी सर्व पापातून मुक्त होतात.

या प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांनी तुळशीचे महत्व सांगितले. चला जाणून घेऊया तुळशीबद्दल महत्वपूर्ण गोष्टी आणि भगवान श्री कृष्ण यांनी सांगितलेलं मंत्र यांबद्दल.

शास्त्रानुसार तुळशीला जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगी येणारे रोप मानले गेले आहे. घरामध्ये तुळस असल्याने चारही बाजूचे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीचे रोप फक्त घरातील हवाच शुद्ध करत नाही तर घरातील अनेकप्रकारचे वास्तू दोष सुद्धा नष्ट करतात.

वास्तु शास्त्रनुसार तुळशीचे रोप योग्य दिशेला असणे आवश्यक आहे. जर तुळशीचे रोप योग्य दिशेला नाही लावले आणि ते चुकीच्या ठिकाणी असेल तर काही प्रकारचे दोष निर्माण होतात आणि तुळशीचे रोप हळू हळू सुकून जाते ज्यामुळे घरात काही प्रकारचे संकट उभे होतात.

कारण चुकीच्या ठिकाणी तुळशीचे रोप असल्याने घरात नकारात्मकता येते ज्यामुळे आर्थिक हानी चा सामना करावा लागतो. तुळशीचे झाड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले पाहिजे, तुळशीचे रोप घराच्या दक्षिण दिशेला लावू नये नाहीतर मग हे झाड दक्षिण दिशेपासून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे लवकर सुकून जाते आणि घरात दुःखाचे वातावरण राहते.

काही स्त्रिया अंघोळ झाल्यानंतर आपले केस मोकळे सोडूनच तुळशीला जल अर्पण करतात पण शास्त्रानुसार हे चुकीचे आहे. तुळशीला देवाकडून नेहमी सुहागण राहण्याचे वरदान मिळाले आहे म्हणून सौभाग्यामध्ये वृद्धी होण्यासाठी महिलांनी आपले केस बांधुन डोक्यावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण केले पाहिजे.

तुळशीजवळ उष्टे, चप्पल-बूट, झाडू आणि कचरा चुकूनही ठेऊ नका यामुळे तुळशीचा अपमान होतो. ज्या कुंड्यामध्ये तुळशीचे झाड लावले असेल त्यामध्ये दुसरे झाड लावू नका. तुळशीला दूध मिक्स करून पाणी अर्पण केले तर तुळस नेहमी हिरवीगार राहते व घरात सुख समृद्धी राहते.

काही लोक संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावत असताना पाणी अर्पण करतात पण असे करणे अशुभ मानले गेले आहे, संध्याकाळच्या वेळी तुळशीला कधीच जल अर्पण करू नये आणि तिला स्पर्श ही करू नये.

तुळशी जवळ दिवा लावत असताना दिव्याखाली तांदळाचे दाणे अवश्य ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी राहील.वास्तूशास्त्रानुसार तुळशीजवळ पाणी भरलेले पात्र ही कधी ठेऊ नये. तुळशीचे रोप अश्या ठिकाणी लावू नये ज्या ठिकाणी घाण असेल.

तुळशी समोर बोलण्याचा मंत्र – लक्ष्मी बीज से श्रीम, माया बीज से रिन, काम बीज से क्लीन आणि वाणी बीज से हिम. हे बीज पूर्व बाजूला उच्चरण करून या मंत्राचा जप नित्य तुळशी समोर केला पाहिजे “श्री रहीं क्लिं वृंदवनये स्वाहा”. अस केल्याने प्रत्येक कामात यश मिळते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here