नमस्कार मित्रानो
मित्रानो आज आपण शिव महापुराणात उल्लेखित इच्छा पूर्ती उपाय जाणून घेणार आहोत. आपल्या मनात जर खूप वर्षांपासून एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर हि इच्छा पूर्ण होण्यासाठी , मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय तुम्ही अवश्य करा.
शिवमहापुराणात या महाउपायचा उल्लेख आढळून येईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या अंगणातील तुळशीजवळ जायचं आहे , तिला मनोभावे वंदन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीच्या १०८ मंजिरी तोडायच्या आहेत.
मित्रानो १०८ मंजिरी जर उपलब्ध नसतील तर जितक्या असतील तितक्या तोडाव्यात आणि जेव्हा यांची संख्या १०८ होईल तेव्हा या मंजिऱ्यांची माळ बनवून आपण ती भगवान श्री हरी श्री विष्णूंचा एकरूप शालिग्राम यांना वाहायची आहे , अर्पण करायची आहे.
ती अर्पण करताना आपण भोलेबाबांचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमः शिवाय , ओम नमः शिवाय असा शिवशंभूंच्या नावाचा जप करत हि तुळशीच्या मंजिरीची माळ अर्पण करायची आहे.
मित्रानो शालिग्राम हे माता तुळशीची पती आहेत. तुळशीचा विवाह दर वर्षी आपण संपन्न करतो तो शालिग्राम यांच्याशीच लावला जातो. भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करत हि माळ शालिग्राम यांना अर्पण करायची आहे.
अर्पण केल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती त्या ठिकाणी बोलून दाखवायची आहे. मित्रानो एक अत्यंत महत्वाची गोष्ट पुराणात सांगितली आहे कि तुळशीच्या मंजिरी जेव्हा जेव्हा तुळशीला येतील तेव्हा तेव्हा त्या मंजिरी आपण काढाव्यात.
कारण या ज्या मंजिरी असतात त्या तुळशी वरती कर्ज मानलं जात. ज्या घरातील तुळशीवर मोठ्या प्रमाणात मंजिरी असतात त्या घरात सतत काही ना काही समस्या वारंवार उदभवतात. म्हणून मंजिरी आल्यास ताबडतोब काढत चला.
तर मित्रानो हा उपाय केल्याने तुमची कितीही जुनी इच्छा असुद्या , भक्ती भावाने हा उपाय केलात तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.