चांगली वेळ येण्यापूर्वी तुळशी देते हे संकेत….

0
4255

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खुपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खुप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत.

भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे.

याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे , म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे. ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्याचसोबत आपल्याला काही संकेत ही देतात.

हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात.

घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा. चला तर मग जाणून घेऊया हे संकेत.

काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते, आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे. किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा ही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका.

तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी सारख्या समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. अस होत असल्यास, विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा नक्की लावा.

तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खुप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल संकेत देतात.

आपण अस ही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्ती मुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे.

काही लोक जेवढ्या वेळेस तुळशीचे रोप लावतील तेवढ्या वेळेस ते सुकते याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे. ज्यामुळे तुमच्या घरात तुळशीचे रोप राहत नाही. तुम्ही लवकरात लवकर वास्तू शांती , हवन किंवा सत्य नारायण पूजा करून घ्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here