नमस्कार मित्रानो
तूळ हि राशी चक्रातील सातवी राशी असून तूळ राशीच जे बोध चिन्ह आहे ते म्हणजे तराजू. व्यापार , समतोलपणा , न्यायदान याच प्रतीक समजलं जाणार हे तराजूच चिन्ह आहे.
अगदी सेम गुणधर्म या राशीच्या मंडळींमध्ये असतात. स्वभावात असणारा समतोलपणा , सामंजस्य आणि कोणत्याही विषयाच गांभीर्य यांच्यात खूप सुंदर रीतीने ओतपोत भरलेलं असत.
कोणत्याही परिस्थितीत न्यायबुद्धीने वागण्याकडे यांचा नैसर्गिक कल असतो. कोणावरही अन्याय होणार नाही आणि नेहमी खऱ्याच्या बाजूने उभे राहणारे या राशीचे लोक असतात.
कोणत्याही व्यापारात हि मंडळी यशस्वी होऊ शकतात. तसेच या राशीचा कारक ग्रह शुक्र आहे. वायू तत्वाची हि राशी असल्यामुळे प्रचंड हुशार , बुद्धिमान , अभ्यासू स्वभावाची हि राशी मानली जाते.
हि मंडळी कोणत्याही कामाची लाज बिलकुल बाळगत नाहीत. प्रत्येक काम श्रेष्ठ असत आणि ते काम पूर्ण अभ्यास करून , कष्टाने , मेहनतीने केले कि त्याच्यामध्ये चांगले यश मिळवता येत असा त्यांचा विश्वास नसतो हे स्वतः त्यांच्या कार्यपद्धतीने सिद्ध करून दाखवताना दिसतात.
कला , इंटेरियर , फॅशन डिझाईन , कलाकार , चित्रकार , फोटोग्राफर , वकील , न्यायाधीश , न्यायव्यवस्था , वाणिज्य विभाग , अकौंटिंग हि सर्व क्षेत्रे या राशीच्या मंडळींना विशेष भावणारी असतात.
कौटुंबिक सदस्याच्या काही बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि तुम्ही त्यांच्याबद्दल द्वेष मनात ठेवू शकता. कमीपणा घेतला नाही तर प्रकरण वाढेल , त्यामुळे वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वडील तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवतील.
या महिन्यात सर्व काही सामान्य असेल, परंतु एखाद्या गोष्टीबद्दल वादविवाद होऊ शकतो. संयुक्त कुटुंब असेल तर काही गोष्टींवरून सदस्यांमध्ये आपसात वाद होतात. त्यामुळे आनंदात घट होऊन मनही अस्वस्थ होईल.
तथापि, महिनाअखेरीस सर्व काही पूर्वपदावर येईल आणि परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. महिन्याच्या मध्यात वडीलधाऱ्या व्यक्तींची प्रकृती बिघडू शकते म्हणून घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचे लहान भाऊ किंवा बहिणी असतील तर त्यांना बाहेर फिरायला पाठवू नका.
व्यावसायिकांना या महिन्यात फायदा होईल. तुम्हाला तुमच्या ग्राहकांचा आणि भागीदारांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्याबद्दल बाहेर सकारात्मक वातावरण असेल आणि सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर तिथून तुम्हाला नफा मिळेल पण तो समाधानकारक नसेल.
सरकारी नोकरी करणार्यांना वरच्या अधिकार्यांचे सहकार्य मिळेल. काही महिन्यांपासून काही काम करण्याची इच्छा असेल तर ते काम या मी महिन्यात पूर्ण होईल. नवीन नोकरी शोधत असाल तर या महिन्यात लक्ष ठेवा कारण काही चांगल्या ऑफर तुमच्या हातात येऊ शकतात.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत काळजी वाटू शकते. त्यांचा त्यांच्या अभ्यासाबाबत भ्रमनिरास होऊ शकतो आणि ते इतर कोणत्यातरी क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करू शकतात. अशा परिस्थितीत संयमाने काम करा आणि विचार करूनच कोणताही निर्णय घ्या.
जर तुम्ही अकरावी किंवा बारावीला असाल तर हा महिना तुमच्यासाठी शुभ चिन्हे घेऊन आला आहे. शिक्षकांकडून योग्य सहकार्य मिळेल आणि मित्रांकडूनही मदत मिळेल. तुम्ही कोणत्याही परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल.
जर तुमचे लग्न होऊन थोडाच काळ लोटला असेल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराप्रती अधिक ओढ वाटेल. दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षणाची भावना निर्माण होईल आणि दोघेही एकमेकांना अधिक वेळ देऊ शकतील. हा महिना प्रेमसंबंधांसाठी चांगला परिणाम देईल आणि दोघांच्या नात्यात उबदारपणा येईल.
जर तुम्ही अविवाहित असाल आणि जीवनसाथी शोधत असाल तर या महिन्यात तुम्ही सोशल मीडियावर एखाद्याशी सकारात्मक संभाषण सुरू करू शकता, जे हळूहळू प्रेमप्रकरणात बदलेल. त्यामुळे सुरुवातीपासून लक्षात ठेवा कि अति उत्साहीपणा टाळा.
मणक्यात किंवा कंबरेमध्ये समस्या असू शकते जी दीर्घकाळ टिकेल. यापासून आराम मिळवण्यासाठी औषधांची मदत घेऊ नका कारण यामुळे त्रास वाढेल. यासाठी शरीरातील प्रेशर पॉइंट्स दाबल्यास जास्त आराम मिळेल.
महिन्याच्या मध्यात काही गोष्टींबद्दल तणाव असू शकतो, ज्यामुळे निद्रानाश, अस्वस्थता अशा काही समस्या त्रास देऊ शकतात. या सगळ्यापासून मुक्त होण्यासाठी कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोला आणि सर्व काही सांगा. समस्येवर नक्कीच उपाय सापडेल.
एप्रिल महिन्यासाठी तूळ राशीचा भाग्यशाली अंक 6 असेल. त्यामुळे या महिन्यात 6 अंकाला प्राधान्य द्या. एप्रिल महिन्यात तूळ राशीचा शुभ रंग हिरवा असेल. त्यामुळे या महिन्यात हिरव्या रंगाला प्राधान्य द्या.
जर तुम्हाला भाऊ किंवा बहीण असेल तर तुमच्या दोघांमध्ये कटुता निर्माण करण्याचा तिसरा व्यक्ती प्रयत्न करेल. त्यासाठी काही जुन्या गोष्टींचा आधार घेतला जाईल. त्यामुळे याबाबत अगोदरच काळजी घ्या.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.