नमस्कार मित्रानो
मित्रानो सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. येणारा प्रत्येक दिवस सोशल मीडियावर काही ना काही नवीन घेऊन येतो. या आधी सुद्धा शाळेतील मुलांचे बरेच व्हिडियो व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आताच्या परिस्थितीत इंग्रजी माध्यमांना एवढे महत्व प्राप्त झाले आहे कि मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत.
मित्रानो याच परिस्थितीत एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेचा आणि विद्यार्थ्यांचा डान्सचा व्हिडियो सोशल साईट्स वर धुमाकूळ घालताना दिसतोय.तुम्ही आज वर पहिलेच असेल कि मराठी माध्यमांत शिकणारे विद्यार्थी टॅलेंटच्या बाबतीत इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मात देतात. म्हणजे यांच्या अंगी कला ठासून भरलेली असते असे म्हणणे गैर वाटणार नाही.
मित्रानो तुम्ही व्हिडियो पाहताना समजेल कि डान्स करताना शिक्षिका स्वतः किती उत्साही आहेत. आता शिक्षिकाच इतक्या उत्साही म्हटल्यावर पोरं पण तितकीच डान्स करताना उत्साही असलेली पाहायला मिळतील. शिक्षिका जसा डान्स करत आहेत तसेच ती मुले शिक्षिकेला फॉलो करून डान्स स्टेप्स करत आहेत.
माहिती मिळाल्यानुसार हि मुले आदिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी केलेला हा डान्स हिंदी गाण्यावर आधारित आहे. हिंदी गाण्यावर केलेला डान्स त्यांच्यासाठी एक कौतुकाची बाब आहे. असा हिंदी गाण्यावर डान्स त्यांनी फक्त आजवर टीव्ही मध्येच पाहिला असेल.
बघा व्हिडियो