मकर संक्रांतीला सूर्याकडे बघून फेका हि 1 वस्तू . 7 पिढ्या पैशांवर राज्य करतील

0
728

नमस्कार मित्रानो

मित्रानो मकर संक्रांतीला सूर्याला नक्की अर्पण करा हि एक वस्तू. मित्रानो 15 जानेवारी रोजी रविवारी मकर संक्रांतीचा सण आलेला आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि सूर्याचं उत्तरायण सुरु होत आहे.

मित्रानो सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा अतिशय शुभ आणि पवित्र असा दिवस आहे. जी व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा करते त्या व्यक्तीला नवीन ऊर्जा ,शक्ती , तेजस्विता आणि आरोग्य प्राप्त होत. सोबतच समाजात मान , सन्मान देखील प्राप्त होतो.

त्यामुळे मित्रानो सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत करण्यासाठी या मकर संक्रांतीला काही विशेष उपाय नक्की करावे. मित्रानो आज आपण अगदी साधा सोप्पा दोनच मिनिटांत होणारा उपाय पाहणार आहोत.

या उपायामुळे तुमच्या जीवनातील गरिबी , दरिद्रता कायमची निघून जाईल. जर तुम्हाला एखादा आजार आहे , जर घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल , अनेक दिवसांपासून एखाद्या आजारामुळे ग्रासलेली असेल तर या उपायामुळे तुमचे आजारपण देखील दूर होईल.

त्याचबरोबर कर्ज असेल , कर्ज फिटत नसेल , घरामध्ये पैसा टिकत नाहीये , धन संबंधित कोणतीही समस्या असेल मित्रानो या उपायामुळे या समस्या देखील नक्कीच दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय नक्की कसा करायचा.

मित्रानो हा उपाय करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदया पूर्वी उठायचं आहे. स्नान आदी उरकून स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत. त्यानंतर एका तांब्याच्या धातूपासून बनलेल्या एका तांब्यामध्ये जल घ्यायच आहे.

आता या जलामध्ये थोडेसे अक्षद , थोडेसे काळे तीळ आणि एखाद लाल रंगाचं फूल टाकायचं आहे. सोबतच आपल्या हातामध्ये सुद्धा थोडे काळे तीळ घ्यायचे आहेत. आता सूर्य देवाला जेव्हा हे अर्घ देणार आहोत त्याआधी हातातील काळे तीळ सूर्याच्या दिशेने फेकायचे आहेत.

पूर्व दिशेला सूर्य देवाकडे बघून हातातील काळे तीळ फेकायचे आहेत. यावेळी ओम सूर्याय नमः , ओम भास्कराय नमः , ओम मित्राय नमः , ओम आदित्याय नमः अशा सूर्यदेवांच्या नावांचा जप करायचा आहे.

मित्रानो सूर्यदेवाची सर्व नावे तुम्हाला माहित नसतील तर फक्त ओम सूर्याय नमः या मंत्राचा १२ वेळा उच्चार करायचा आहे. आता मनोभावे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत , दुःख आहेत , इच्छा आहेत त्या सर्व बोलून दाखवायच्या आहेत.

आपल्या जीवनातील गरिबी, दरिद्रता , शत्रू नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर फुल, तांदूळ आणि तीळ मिश्रित जलाने सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे. मित्रानो या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख , संकट , गरिबी , दरिद्रता याचा नाश होईल.

याचबरोबर कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होईल. सूर्य ग्रह मजबूत झाल्याने समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला सफलता मिळेल. चांगले आरोग्य लाभेल आणि शत्रूंचा नाश होईल.तर मित्रानो या मकर संक्रांतीला हा अगदी छोटासा आणि सोप्पा उपाय नक्की करू बघा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here