सूर्याला अर्घ्य देते वेळी चुकून सुद्धा करू नका या चुका…

0
845

नमस्कार मित्रानो

मित्रांनो, सनातन धर्म संबंधित लोकांना हे माहिती असेल की, सकाळी स्नान केल्यानंतर दररोज सूर्याला जल वाहिले जाते. परंतु हे करतेवेळी आपल्या हातून अशा काही गोष्टी होतात त्यातून हे जल वाहण्याचे फायदे नष्ट होतात. चला तर मग जाणून घेऊयात सूर्याला अर्घ्य देते वेळी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल.

तांब्याच्या कलशाने सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला जलं वाहणे अत्यंत शुभ मानले जाते, असे पुराणात सांगितले आहे. पाण्यासोबत अक्षदा आणि फुलं वाहिल्याने सूर्य देव लवकर प्रसन्न होतात.

सोबतच जल देतेवेळी ‘ॐ सूर्याय नमः|’ हा मंत्रोच्चार करावा. तुमच्या मनात, शरीरात, अवतीभवती सकारात्मक ऊर्जा साकारते. नेहमी आजारी असलेल्या व्यक्तींनी अशाप्रकारे सूर्याला जल वाहिल्यास त्यांच्या तब्येती संबंधित तक्रारी दूर होतात.

कुंडलीमध्ये सूर्य दशा ठीक नसल्यास सुद्धा हा उपाय केला जातो. घरामधील सर्व समस्यांचे निवारण होऊन सुख शांती नांदते. आत्मविश्वास प्रचंड वाढतो. सूर्यदेवाला जल वाहताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

तुमच्या हातून देखील या चुका होत असतील तर सूर्याला अर्घ्य देणे आणि न देणे एक समानच होय. धर्म ग्रंथात सांगितले आहे की हे जल वाहताना पूर्व दिशेकडे तोंड असले पाहिजे. याशिवाय जल वाहत असताना त्याचे थेंब तुमच्या पायावर पडू देऊ नका. असं झालं तर ते अशुभ आहे.

यामुळे सूर्यदेव क्रोधित होतात अशी मान्यता आहे. स्नान न करता सूर्याला अर्घ्य कधीही देऊ नये. सुर्यदेवांना स्वच्छता आवडते. नेहमी तांब्याच्या धातूचा उपयोग करावा. तुम्ही अनेकदा पाहिले असेल आजकाल पूजेमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो.

परंतु तुम्ही नियमित सूर्याला अर्घ्य देत असाल तर ते प्लास्टिक अथवा स्टीलचे भांडे असू नये. नेहमी तांब्याचा कलशाचा वापर करावा. अर्घ्य देण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे ब्रम्हमुहूर्त आहे.

अर्घ्य देण्यापूर्वी तुम्ही तुमचे सर्व प्रात: विधी आटोपले पाहिजे. स्वच्छ वस्त्र धारण करूनच अर्घ्य द्यावे. असं केल्याने सूर्यासोबत नवग्रहांचे कृपा अर्घ्य देणाऱ्या वर राहते. जल वाहताना त्यामध्ये अक्षदा, कुंकू, फुल हे अवश्‍य असावे.

अर्घ्य देते वेळी आणखी एक गोष्टीचे ध्यान ठेवा ते म्हणजे तुमचे हात तुमच्या डोक्यापेक्षा उंच असू द्या. जल अर्पण करतेवेळी त्या पाण्याच्या धारेतून सूर्याचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते.

असं केल्याने सूर्य देवांची कृपा प्राप्त होऊन तुम्ही कोणत्याही संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास प्राप्त करता. यावेळी चप्पल घालू नये. इतर दिवशी शक्य नसल्यास रविवारी मात्र सूर्याला अर्घ्य नक्की द्या.

रविवार सूर्याचा वार मानला जातो. यामुळे कुंडलीतील सूर्य दोष असेल तरीदेखील सर्व दोष गुणांमध्ये बदलतो. रविवारी मांसाहार करू नये. लाल रंगाची भाजी अथवा मसुरची डाळ खाऊ नये.

रविवारी गोड पदार्थाचे सेवन करणे चांगले मानले जाते. सोबतच रविवारी लाल रंगाचे कपडे चुकूनही घालू नका.वर दिलेली माहिती वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की, सुर्यदेवांना जल वाहते वेळी कोण कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. सुर्यदेवांची तुमच्यावर कृपा राहो. शुभं भवतु ||

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here