नमस्कार मित्रानो
साधा साप दिसला की तो मारायचा..हे सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे..साप म्हणजे शत्रू, हीच शिकवण पिढ्यान्पिढ्या मिळाली आहे. साप ही जमात मानवी अप्रचाराने बदनाम झाली आहे.
विषारी साप कुठला आणि बिनविषारी कुठला, हे ओळखता न आल्याने माणूस घाबरतो. त्याच्या या अज्ञानातूनच सापांवर वार केले जातात. सापांच्या जाती ओळखता न आल्याने सुद्धा अनेक जणांचा जीव जातो.
साप म्हटलं की त्या पाठोपाठ येते भीती आणि अंधश्रद्धा. या कारणांमुळेच साप दिसला की ठेचला जातो. असे हजारो साप भारतात रोज मारले जातात. हे पाहून असं वाटतं की आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारायचे काम करतो.
साप जेवढा शेतकर्यांचा मित्र आहे, त्याहून ज्यादा तो सबंध पृथ्वीवरील मानवजातीचा मित्र आहे. कारण जवळ जवळ 30 टक्के औषधांमध्ये सर्पविष हे औषध म्हणून वापरले जाते.
उदाहरण घ्यायचं म्हटलं तर…अंगदुखी, कॅन्सर; तसेच भूल देण्याच्या इंजेक्शनमध्ये या विषाचा वापर होतो. म्हणूनच साप हा मानवाचा मित्र आहे.
मित्रानो अनेकांचे म्हणणे आहे की निसर्गाने सापाला काही विशेष शक्ती दिल्या आहेत ज्यामुळे ती स्त्री गर्भवती आहे की नाही हे सापाला कळते. गर्भधारणेनंतर, शरीरात असे काही घटक तयार होतात जे साप ओळखू शकतात.
स्त्रीच्या गर्भधारणेची माहिती सापाला मिळते असे आपण गृहीत धरूया. मात्र साप गर्भवती महिलांना का चावत नाही, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. याबाबत वृत्तपत्रात बातमीही आली होती की, गर्भवती महिलेला साप चावला असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महिला गरोदर असल्याने तिला काही होणार नाही, असे लोक म्हणू लागले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा साप बिनविषारी असल्याचे निष्पन्न झाले. गर्भवती महिलेला पाहून साप आंधळा होतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. असे का घडते याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात सर्पदंशामुळे एकाही गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे ऐकले नाही. ही सगळी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी सापांपासून स्वतःचे संरक्षण करावे आणि साप चावला तरी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.