असं आहे सिंह राशीचे प्रेम… जाणून घ्या सविस्तर माहिती.

0
6778

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आज आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या व्यक्ती जर प्रेमात असतील तर यांच्या अपेक्षा काय असतात? कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात. त्यांच्या स्वभावतल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घ्यायला हव्यात जेणेकरून तुमचे प्रेम वाढत जाईल.

सिंह राशीच्या व्यक्ती जर प्रेमात असतील तर यांची वर्तणुक कशी असेल हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे गुणधर्म, स्वभाव पाहणं गरजेचं आहे. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य किंवा रवी आहे. ही रास स्थिर तत्वाची आहे, अग्नी तत्व यामध्ये शामिल आहे. सिंह म्हणजे जंगलचा राजा अशाच प्रकारचे गुणधर्म या राशीच्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.

सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे यांचा आत्मविश्वास, 12 राशींपैकी सर्वात जास्त आत्मविश्वास हा या राशीमध्ये असतो. तसेच या व्यक्तींमध्ये धैर्य असते. कोणत्याही परिस्थितीला, व्यक्तीला ही रास घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणं हे या राशीच्या मंडळींना चांगलं माहीत असतं.

या व्यक्तींची मानसिक स्थिती ही कमालीची असते. ही रास खूप मेहनती आहे , एकदा कोणता निर्णय घेतला तर तो पूर्ण करण्यासाठी जी मेहनत लागते ती या राशीमध्ये पुरेपूर दिसून येते.

दिवस रात्र मेहनत करून आपलं जे टार्गेट आहे, ते ही रास सहजपणे पूर्ण करतात. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी ही रास थोडासा वेळ घेतात, विचार करतात आणि मगच पुढे जातात. या राशीमध्ये एक सकारात्मक ऍटिट्यूड असतो.

या राशीचे लोक हे हट्टी स्वभावाचे असतात , म्हणजे जी गोष्ट हवी आहे ती मिळवणारच, आणि त्या गोष्टीसाठी कोणत्याही टोकाला ही रास जाऊ शकते. मगाशी सांगितल्याप्रमाणे धैर्य ही या राशीची गुरुकिल्ली आहे प्रश्न फक्त इतकाच की ती सकारात्मक पणे बाहेर यायला हवी.

लिडरशिप क्वॉलिटी या राशीमध्ये चांगली असते, सर्वाना सामावून घेण्याची क्षमता यांच्याकडे चांगली असते. सर्वाना बरोबर घेऊन जाणारी ही रास आहे. माफ करण्याची क्षमता या राशीमध्ये खूपच चांगली आहे. तुमच्याकडून कितीही मोठी चूक झाली असेल आणि यांच्याकडे माफी मागितली तर ही रास लगेच माफ करते.

लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा गुण या राशीमध्ये असतो. या राशीचे राहणीमान, कपडे या गोष्टी खुप ब्रँडेड असण्याची शक्यता असते. सिंह राशीचा बोलकेपणा हा थोडा कमी असतो, ही रास महत्वाचे किंवा जेवढ्यास तेवढे बोलणारे असतात. वायफळ बडबड हे लोक करत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे यांचा चुकूनही अपमान करू नका. एखादी गोष्ट यांना पटवून देऊ नका, एखादी गोष्ट यांना पटत नसेल तर ती समजून सांगण्याचा प्रयत्न करू नका कारण या राशीचे लोक शब्दाने सुद्धा दुखावले जातात.

या राशीच्या लोकांचे शब्द कधी कधी विचित्र, धारदार असू शकतात पण तुम्ही जर का सुंदर वाणीने यांच्याशी बोललात तर ही रास अजिबात उद्धट नाही. या उलट तुमच्या दोन शब्द गोड बोलण्याने सुद्धा ही रास खुश होण्यासारखी आहे.

सिंह राशीची व्यक्ती जर प्रेमात असेल किंवा सिंह राशीच्या व्यक्तीला प्रपोज करायचं असेल तर त्या सिंह राशीच्या व्यक्तीपेक्षा त्यांचा जो पेहराव आहे हा अतिशय चांगला असणे गरजेचे आहे, फिजिकल लूक चांगला असणं गरजेचं आहे. अस जर असेल तर ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच हो म्हणेल.

एकदा का यांचा होकार तुम्हाला मिळाला कि तुमची सर्व जबाबदारी घ्यायला ही रास तयार होते. त्या दृष्टीने ही रास खूप चांगली आहे, तुमच्यासाठी सर्व काही करेल पण यांचा अहमपणा थोडासा सांभाळला पाहिजे.

कमिटमेंट मध्ये सुद्धा या राशीचे लोक चांगल्या प्रकारे आघाडीवर असतात. यांनी जर प्रॉमिस केलं तर सहसा ही व्यक्ती मागे हटत नाही. कारण काही राशींमध्ये हा गुण असतो तर काही राशींमध्ये नाही.

शब्दाला महत्व कस द्यायचं असत हे ही रास दाखवून देते आणि दुसऱ्याकडून ही रास तशीच अपेक्षा करते. कोणत्या ही कारणाने जर तुमच्या प्रेमात भांडण झाले तर काहीही करण्याची गरज नाही फक्त जाऊन माफी मागा. माफी मगितल्यानंतर ही रास अगदीच खुश होऊन जाते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here