नमस्कार मित्रांनो
मित्रानो सिंह हि राशिचक्रातली पाचवी रास असून या राशीचे बोध चिन्ह सिंह म्हणजे जंगलाचा राजा आहे. सर्व जंगलावर जशी याची सत्ता असते , आपला रुबाब , आत्मविश्वास पूर्ण वावर यामुळे जंगलातील सर्व प्राण्यांवर त्याची अघोषित आणि अमर्याद सत्ता असते. किंबहुना ती सत्ता पूर्ण जंगलाने मान्य सुद्धा केलेली असते.
अगदी असेच रुबाबदार व्यक्तिमत्व असत ते म्हणेज सिंह राशीच्या मंडळींच. आपल्या वागण्याने , बोलण्याने हि मंडळी समोरच्या व्यक्तीची मने जिंकून घेतातच पण त्यांच्यावर आपली सत्ता सुद्धा गाजवतांना दिसतात.
हि राशी अग्नितत्वाची आणि क्षत्रिय वर्णाची राशी असल्यामुळे स्वभावात प्रचंड तेजस्विता , लढवय्यापणा असतो. सूर्य हा या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ पदावर काम करायला यांना फार फार आवडत असत.
सामाजिक आणि राजकीय जीवनाची आवड यांना अगदी लहानपणापासूनच असते. लोकांना मार्गदर्शन करण , त्यांना योग्य दिशा दाखवणं , त्यांना मदत करणे , त्यांचे संरक्षण करणे , समाजाचं प्रतिनिधित्व करणे , एखादी जबाबदारी आपल्या अंगावर घेणे या प्रकारची कामे यांना विशेष आवडीची असतात.
मित्रांनो आज आपण माहिती घेऊया की तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे आणि कोणत्या परिस्थितीत तुमची फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. सिंह राशीचे लोक सर्वांवर पटकन विश्वास ठेवतात आणि हा विश्वास तुम्हाला आयुष्यात कुठेतरी मागे ठेवतो.
तुमच्या याच विश्वास ठेवण्याच्या सवयीमुळे बाकीचे लोक अनेकदा पुढे निघून जातात आणि तुम्ही आहे तिथेच राहता. लोक या विश्वासाचा फायदा घेतात.
तसे तर सिंह राशी ही खूप भाग्यवान राशी मानली जाते, असे म्हटले जाते की या राशीचे लोक खूप धैर्यवान असतात, त्यांनी कोणतेही काम करायचे ठरवले तर ते नक्कीच पूर्ण करतात.
पण कधी कधी तुम्ही काही कामात अपयशी देखील होता किंवा तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नाही. कारण हे अपयश तुम्हाला तुमच्या शत्रू राशीमुळे होते कारण काही लोक अशा विरुद्ध राशीचे असतात, ज्यामुळे सिंह राशीच्या लोकांचे काम पूर्ण होत नाही. अनेकदा अयशस्वी होतात.
जर तुम्ही सिंह राशीच्या शत्रू राशींबद्दल विचार केला तर तूळ आणि मकर राशीचे लोक सिंह राशीचे सर्वात मोठे दुष्मन असतात. सिंह राशीचे सिंह राशींसोबत देखील अनेकदा पटत नाही.
जर तुमचे या दोन राशींच्या व्यक्तीशी मैत्री असेल तर हे लोक तुमची फसवणूक करण्यात यशस्वी होतील. त्यामुळे या राशीच्या लोकांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. सिंह राशीच्या लोकांची मेष, कर्क, मिथुन, वृश्चिक, धनु, कन्या आणि मीन राशीच्या लोकांशी मैत्री चांगली जमते आणि भागीदारी चांगली राहते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.