मृत्यू येण्या पूर्वी मिळतात हे विचित्र संकेत..भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितले होते.

0
7248

नमस्कार मित्रांनो

मित्रानो देवा दि देव महादेव या समस्त संसाराच्या कणाकणात स्थित आहेत. शिवच आधी आणि शिवच अनंत आहेत. सर्व शिवभक्त मृत्यूनंतर कैलासात जाऊन मोक्षाची प्राप्ती करतात. शिव यांना भोलेनाथ ही म्हणलं जातं. कारण भक्ती भावाने फक्त यांना जल अर्पित केले तरी ते प्रसन्न होतात.

शिव आणि माता पार्वती कैलासात निवास करतात. एकदा माता पार्वतीने शिव यांना सांगितले की, हे प्रभू काळातून आकाशाचाही नाश होतो, तो भयंकर काळ खूपच विक्राळ आहे. तो स्वर्गाचा एक मात्र स्वामी आहे.

तुम्ही त्याला बंद केले होते पण अनेक प्रकारचे स्रोत वापरून त्याने तुमची स्तुती केली आणि तुम्ही संतुष्ट झाला आणि तो काळ पुन्हा प्रकृतीला प्राप्त झाला. तुम्ही म्हणाला की हे काळ तू सर्वत्र असशील पण लोक तुला पाहू शकणार नाहीत.

तुमची कृपादृष्टी झाल्यामुळे , वर मिळाल्यामुळे काळ जगला आणि त्याचा प्रभाव खुप वाढला. तो काळ तुमच्याच आज्ञेनुसार प्राण्यांचे भक्षण करतो. मृत्यू जवळ आल्यानंतर प्रत्येक मनुष्याला काळाचे दर्शन होते.

काळ जवळ आल्यानंतर मनुष्याला कोणते संकेत मिळतात हे मला सांगण्याची कृपा करा. अशा प्रकारे माता पार्वती ने विचारल्यानंतर महादेव यांनी मरणाच्या आधीचे काही संकेत सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत.

अचानक मनुष्याचे शरीर पिवळे किंवा पांढरे पडत असेल आणि वरून लाल दिसत असेल तर त्या मनुष्याचा मृत्यू सहा महिन्यात होऊ शकतो. जर मनुष्याचे कान, नाक, तोंड, डोळे यांत एकाच वेळी बिघाड झाला असेल तर असे समजले पाहिजे की त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यात होणार आहे.

जेव्हा मनुष्य सूर्य, चंद्र, अग्नी यांना बघू शकत नाही त्याला सर्व काही काळे दिसत असेल तर असे समजले पाहिजे की त्या व्यक्तीचे जीवन सहा महिनेच राहिले आहे. जर मनुष्याचा डावा हात एक आठवड्यापर्यत सारख फडफडत असेल तर त्याचे जीवन एक महिनाच राहिले आहे.

सर्व अवयव आकडत असतील आणि टाळू सुकत असेल तर त्याचे जीवन एक महिनाच राहिले आहे. शिवजी सांगतात ज्या व्यक्तीचे नाक अचानक सतत वाहू लागले असेल तर त्याचे जीवन एक महिनाच राहिले आहे.

जर मनुष्याचे मुख आणि कंठ सारखे कोरडे पडत असतील तर सहा महिन्यातच त्याचा मृत्यू होऊ शकतो. जर मनुष्याला पाणी, तेल, तुप यामध्ये स्वतःची प्रतिमा दिसत नसेल तर त्यानेही हे जाणून घेतले पाहिजे की त्याचे सुद्धा आयुष्य सहा महिन्यापर्यंत आहे.

जर मनुष्य चंद्राच्या प्रकाशात स्वतःची प्रतिमा डोक्याशिवाय पहात असेल किंवा प्रतिमा बघूच शकत नसेल तर तो व्यकती एक महिनाही जगू शकत नाही. जर चंद्रमंडल किंवा सुर्यमंडल लाल दिसत असेल तर मनुष्याचा मृत्यू 15 दिवसातच निश्चित आहे.

जर एखादी निळ्या रंगाची माशी एखाद्या व्यक्तीला येऊन घेरत असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य एक महिन्यापेक्षा कमी आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here