नमस्कार मित्रानो
मित्रांनो सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनिदेवाच्या प्रकोपाची भीती प्रत्येक व्यक्तीला असते. त्यामुळे शनिदेवाची वाईट नजर आपल्यावर पडणार नाही याची सर्वतोपरी मनुष्य काळजी घेत असतो. जुलैमध्ये दोन राशी शनीच्या नजरेत येणार आहेत.
जुलैमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलत आहेत. त्यात शनीचाही समावेश आहे. 12 जुलै रोजी शनी स्वतःच्या राशीत मकर राशीत प्रतिगामी होणार आहेत. मकर राशीत प्रवेश केल्यानंतर शनि 17 जानेवारी 2023 पर्यंत त्यात राहणार आहे.
एप्रिलमध्येच शनीने आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश केला आणि 5 जून रोजी मार्गी झाले. आता पुन्हा 12 जुलै रोजी शनी स्वतःच्या राशीत मकर राशीत येतील. शनीच्या या बदलामुळे दोन राशी पुन्हा शनीच्या अधिपत्याखाली येणार आहेत.
शनीची चाल बदलताच त्याचे शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येतात. शनीचा मकर राशीत प्रवेश होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीची ढैय्या सुरु होणार आहे. 17 जानेवारीपर्यंत या दोन राशीच्या लोकांवर शनीची क्रूर दृष्टी राहील. या राशींवर शनि अडीच वर्ष नाही तर फक्त 6 महिने राहील.
या दोन राशींना मिळेल मोक्ष
ज्योतिष शास्त्रानुसार 29 एप्रिलला जेव्हा शनीने कुंभ राशीत प्रवेश केला तेव्हा कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिढैय्याची सुरुवात झाली. पण 12 जुलै रोजी जेव्हा शनि मकर राशीत जाईल तेव्हा या दोन्ही राशींची पुन्हा एकदा शनिपासून सुटका होईल.
शनीची क्रूर दृष्टी चांगल्या माणसाचा नाश करते. शनिढैय्या मुळे व्यक्तीला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत व्यक्तीकडून केले जाणारे कामही बिघडू लागते.
त्यामुळे जरा सावध राहण्याची गरज आहे. शनिदेवाचा प्रभाव टाळण्यासाठी जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत करा. मुंग्याना पीठ खाऊ घाला. शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. तसेच सुंदरकांडाचे पठण करावे. असे मानले जाते की हनुमानजींच्या भक्तांवर शनिदेव क्रूर दृष्टी टाकत नाहीत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.