नमस्कार मित्रांनो
मित्रांनो वैदिक ज्योतिषात शनि हा सर्वात मंदगती ग्रह मानला जातो. शनीला एक गोचर करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. शनि हा राजकारण, खनिज, गूढविद्या ,तेल आणि रहस्य इत्यादींचा कारक मानला जातो.
शनिदेवाच्या कृपेशिवाय कोणताही जातक उच्च पद प्राप्त करू शकत नाही, असे म्हटले जाते. 17 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल.
शनीचे कुंभ राशीत स्थानांतर झाल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना शनीच्या साडेसाती आणि शनी धैय्यापासून मुक्ती मिळेल आणि काही राशींवर साडेसातीची सुरुवात होईल.
शनी सध्या मकर राशीत भ्रमण करत आहे. शनि मकर राशीत असल्यामुळे मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर परिणाम होत आहे. तर कुंभ, धनु आणि मकर राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचा प्रभाव आहे.
17 जानेवारीला मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनी कुंभ राशीत प्रवेश केल्यावर शनी धैय्यापासून मुक्ती मिळेल. धनु राशीच्या लोकांवरून शनीची साडेसाती दूर होईल.
17 जानेवारी 2023 रोजी कर्क आणि वृश्चिक राशींवर शनि ढैय्याची सुरुवात होईल. याशिवाय मकर राशीच्या लोकांसाठी शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा आणि मीन राशीच्या लोकांसाठी शनी साडेसातीचा टप्पा सुरू होईल.
धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजींची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. हनुमानजींची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते. शनि मंत्रांचा जप फायदेशीर ठरतो.
शनिवारी शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.