चांगली वेळ येण्यापूर्वी शनी देव देतात हे संकेत…

0
1461

नमस्कार मित्रांनो

मित्रानो शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला यापैकी कशाचेही दर्शन झाले तर शनी देव तुमच्यावर मेहेरबान आहेत आणि लवकरच तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे. शनी देवाच्या प्रति अनेक अख्यायन पुराणात प्राप्त आहेत.

शनी देवाला सूर्य पुत्र व कर्म फळ दाता म्हणले जाते पण त्याचबरोबर शनी संबंधित अनेक मान्यता आहेत त्यामुळे त्याला मारक, अशुभ आणि दुखकारक मानले जाते, पण शनी इतका मारक आणि अशुभ नाही जितके त्याला समजले जाते म्हणून तो शत्रू नाही तर मित्र आहे.

मोक्ष देणारे हे एकमात्र शनी देवच आहेत, शनी प्रकृती मध्ये संतुलन निर्माण करतात आणि प्रत्येक प्राण्यासोबत योग्य न्याय करतात. जे लोक अनुचित समता व अस्वाभाविक समतेला आश्रय देतात शनी फक्त त्यांनाच शिक्षा करतात.

शनीला जुगार-सट्टा खेळणे, दारू पिणे, व्याजाचा धंदा करणे, पर स्त्री कडे वाईट नजरेने बघणे, खोटं बोलणे, निर्दोष लोकांना त्रास देणे. माता-पिता, सेवक, कर्मचारी यांचा अपमान करणे. देवाच्या विरुद्ध होणे, मुक्या प्राण्यांना मारणे या गोष्टी शनी देवाला अजिबात आवडत नाहीत.

शनी देव हे अत्यंत न्यायप्रिय आहेत ते इमानदार लोकांना कधीच कष्ट देत नाहीत पण जे लोक दुसऱ्यासोबत धोका करतात त्यांना शनी देव वेळ आल्यानंतर अशी शिक्षा देतात की त्याने जीवनात जेवढे सुख भोगले असतील त्याच्या खुप पटीने दुःख भोगावे लागते.

शनी देव या पृथ्वी लोकांतील एकमात्र असे स्वामी आहेत जे वेळ आल्यावर व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्मावर त्याला अवश्य दंड देतात. ते कोणालाही क्षमा करत नाहीत यामुळे सर्वजण शनी देवाला घाबरतात.

ते या पृथ्वीचे न्यायाधीश आहेत आणि त्यांना अन्याय कधीच प्रिय होत नाही आणि याच कारणामुळे लोक शनी देवाला क्रूर बोलतात. शनिवार हा दिवस न्यायचा देवता शनी देव याचा आहे. शनिवार आणि शनी देवाच्या बाबतीत लोकांच्या अनेक मान्यता आहेत, काही लोक शनिवार ला शुभ मानत नाहीत आणि कोणत्याही वाईट घटनेसाठी या दिवसाला जबाबदार मानतात पण असे काहीच नाही.

तुम्हाला जर शनिवारच्या दिवशी यापैकी एखादी गोष्ट दिसली असेल तर अस समजुन जा की शनी देव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या जीवनातील समस्यांचा आता अंत होईल.

या गोष्टींचे दर्शन झाल्यास शनी देवाचे नक्की ध्यान करा आणि संध्याकाळच्या वेळेत शनी मंदिरला जाऊन त्यांची पूजा अवश्य करा. शनी देवाच्या कृपेने तुमचे सर्व दुःख दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया शनिवारी कोणते संकेत मिळणे शुभ असते.

भिकारी – शनिवारी सकाळी कोण भिकारी किंवा निर्धन व्यक्ती तुमच्या द्वारावर आला किंवा दिसला तर हे शुभ संकेत मानले गेले आहे जर असे झालेच तर तुम्हाला त्यांची योग्य ती मदत केली पाहिजे यामुळे शनी देव प्रसन्न होतात.

सफाई कर्मचारी – शनिवारी सकाळी जर तुम्हाला सफाई कर्मचारी झाडू लावताना दिसला किंवा तुमच्या घरी काम करत असेल तर त्याला काही पैसे नक्की द्या यामुळे तुमच्या धनात वृद्धी होईल.

काळा कुत्रा – शनिवारी काळा कुत्रा दिसणे ही शुभ मानले जाते. जर शनिवारच्या दिवशी शनिमंदिराजवळ किंवा अन्य ठिकाणी काळे कुत्रे दिसले तर त्यांना भाकरी अवश्य खायला द्या. अस केल्याने शनी देवाची विशेष कृपा प्राप्त होईल.

कावळा – शनिवारच्या दिवशी अंगणात कावळा पाणी पीत असताना दिसणे खूपच शुभ मानले जाते अस झाल्यास तुम्हाला लवकरच शुभ समाचार मिळणार आहे. पण जर कावळा शनिवारी येऊन तुमच्या डोक्यावर चोच मारत असेल तर हा अशुभ संकेत आहे. यावरून हे समजते की शनी देव तुमच्यावर नाराज आहेत. म्हणून तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनी देवाची क्षमा मागितली पाहिजे.

काळ्या गाईचे दर्शन – जर तुम्ही शनिवारच्या दिवशी कोणत्या महत्वपूर्ण कामासाठी जात असाल आणि रस्त्यात तुम्हाला काळ्या गाईचे दर्शन झाले तर तुम्हाला त्या कार्यात अवश्य यश प्राप्त होईल.

असेही मानले जाते की शनिवारी द्वारावर काळ्या गाईचे येणे सुद्धा शुभ संकेत आहे. शनिवारी काळ्या गाईची पूजा नक्की करा यामुळे तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here