४ डिसेंबर, शनी अमावस्या.उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू..करणी,बाधा,नजरदोष होईल दूर..माता लक्ष्मी शोधत येईल..

0
591

नमस्कार मित्रानो

ॐ नमः शिवाय || मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. परंतु जेव्हा ही अमावस्या तिथी सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी येते तेंव्हा त्याचे महत्त्व द्विगुणित होते.

४ डिसेंबर २०२१ रोजी शनि अमावस्येचा योग आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या म्हणतात. या दिवशी स्नान, दान आणि पूजा पाठाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी केल्या जाणार्‍या दान आणि पूजापाठाने आपल्याला अनंत काळापर्यंत विशेष फळ प्राप्त होते.

आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की जे या विशेष दिवशी विशेष स्थितीला काही वेगळे प्रयोग करतात. करणी बाधा करतात यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. परिणामी आपल्या आयुष्यात आणि घरांमध्ये अशांतता येते. नकारात्मकता वाढते.

परिणामी प्रत्येक कार्यामध्ये असफलता मिळत राहते. आपल्या जवळील धन, पैसा, सुख-समृद्धी दुसऱ्याकडे निघून जाते. वाईट शक्तींचा, करणी बाधेचा किंवा नजर दोषाचा आपल्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये याकरिता या शनि अमावस्याच्या दिवशी पुढील प्रमाणे सांगितलेला अत्यंत साधा सरळ उपाय तुम्ही नक्की करून बघा.

आपल्या जीवनात आणि घरामध्ये वाईट शक्तींचा, करणी बाधा व नजर दोषाचा कोणताही नकारात्मक प्रभाव होऊ नये यासाठी कोणता उपाय शनी अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. या उपाय यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करावा लागणार आहे.

तुरटी चे तुकडे हातात घेऊन अकरा वेळा व्यक्तीची नजर काढल्याने नजर दोषातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्‍ट होतो. घरातील नकारात्मक उर्जेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी तुरटीचे छोटे तुकडे, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना ठेवायचे आहेत.

तुम्ही खिडकी मध्ये देखील ठेवू शकता किंवा बाहेरून घरामध्ये जिथे हवा येते त्या सर्व ठिकाणी आपल्याला तुरटी चे छोटे तुकडे ठेवायचे आहेत. हे तुरटी चे तुकडे संपूर्ण रात्र आणि दिवस तसेच राहू द्यायचे आहेत.

रविवारी सकाळी झोपेतून उठल्यावर हे तुरटी चे तुकडे उचलून घरापासून दूर टाकून द्यायचे आहेत. अथवा वाहत्या पाण्यामध्ये देखील हे तुरटी चे तुकडे तुम्ही टाकु शकता.

या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा जाईल. कोणी करणी केली असेल किंवा वाईट शक्तींचा प्रभाव असल्यास तो नष्ट होईल. हा साधा सरळ उपाय घरातल्या घरात तुम्ही अगदी सहज करू शकता. शुभं भवतु!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here