कोणत्याही शनिवारी करा हे पाच उपाय…शनिदेवाच्या कृपेने उजळेल भाग्य

0
52

नमस्कार मित्रांनो

मित्रानो ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होऊ शकतात. चला जाणून घेऊया ते कोणते उपाय आहेत, जे केल्याने शनिदेवाची कृपा होते असे मानले जाते.

आज शनिवार, आजचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेव हे न्याय देव आहेत. शनिदेव प्रसन्न झाले तर भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शनि भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.

म्हणूनच असे म्हणतात की कोणतेही चुकीचे कर्म करण्यापूर्वी विचार करावा. ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होऊ शकतात. चला जाणून घेऊया ते कोणते उपाय आहेत, जे केल्याने शनिदेवाची कृपा होते असे मानले जाते.

शनिवारी काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात प्रवाहित करताना ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि उत्पन्न वाढते असे मानले जाते.

पुष्य नक्षत्रात शनिवारी एका ग्लास पाण्यात थोडी साखर मिसळून ते पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर काळे तीळ घेऊन शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा. यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.

शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला 11 पिंपळाच्या पानांची माळ अर्पण करा आणि शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा. कायदेशीर बाबींशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील.

शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्चा धागा बांधावा. असे केल्याने प्रगती किंवा कार्य पूर्ण होण्यात येणारा अडथळा दूर होतो असे मानले जाते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here