प्रचंड संशयी असतात या 3 राशीचे लोक. तुमची रास यात आहे का ?

0
2669

नमस्कार मित्रानो

मित्रानो या ३ राशीची लोकं अशी आहेत ज्यांच आपल्या जोडीदारावर अगदी बारीक लक्ष असतं. मित्रानो प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या स्वभावाचा , वेगवेगळ्या विचारसरणीचा , क्षमतेचा किंवा सवयी असणारा असतो. यातीलच काही गोष्टी त्याच्यामध्ये जन्मातच असतात तर काही काळानुसार सवयीनुसार असतात.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव , वागणूक , व्यक्तिमत्व आणि अगदी भविष्यावरही त्याच्या राशीचा आधार घेऊन त्याच्यावर भाष्य केले जातं.
राशीशी संबंधित गुण – अवगुण सहसा त्यांच्यात दिसतात.

आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचा स्वभाव खूप संशय घेणारा असतो. यातील ३ राशीची लोक आपल्या जोडीदारावरच नाही तर आजू बाजूच्या सर्वांवर संशय घ्यायला पुढे असतात. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

कन्या रास

कन्या राशीच्या व्यक्ती या मुळातच संशयी वृत्तीच्या असतात. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा किंवा तुलना करणाऱ्या असतात. बौद्धिक गोंधळ होणाऱ्या मनावर सतत कसला ना कसला तरी ताण असणाऱ्या अशा कन्या राशीच्या व्यक्ती असतात.

या राशीच्या व्यक्ती फार हिशोबी सुद्धा असतात. कन्या राशीच्या स्त्रियांचा विचार करता या स्त्रीया संसारासाठी योग्य जोडीदार असतात. कारण त्या काटकसरी असतात. त्यांना स्वच्छतेची आवड असते. स्वयंपाकाची सुद्धा आवड असते.

परंतु त्यांच त्यांच्या नवऱ्यावर अगदी बारीक लक्ष असतं , हे सुद्धा तेवढंच खरं. हाच प्रकार असतो कन्या राशीच्या पुरुषांचा सुद्धा. कन्या राशीचे पुरुष सुद्धा चौकस असतात , बुद्धिमान असतात. सोबतच हजरजवाबी सुद्धा असतात. स्वतःची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतात.

कारण कुटुंबवत्सल असतात. परंतु त्यांच सुद्धा त्यांच्या जोडीदारावर अगदी बारीक लक्ष असतं. कन्या राशीच्या व्यक्ती फक्त जोडीदारावरच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्याच व्यक्तींवर आणि सर्वच गोष्टींवर संशय घेण्यात पुढे असतात. कपडेसुद्धा चार वेळा झटकून घालतील असा स्वभाव कन्या राशीचा असतो.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा नेहमी काहीतरी लपवण्याकडे असतो. काहीसा आतल्या गाठीचा स्वभाव असतो अस म्हणायला हरकत नाही. त्यांच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता ते कधीच कुणाला लागू देत नाही.

पण समोरच्यावर त्यांच अगदी बारीक लक्ष असतं. उडणाऱ्या पाखरा चे पंख मोजता येतील इतक त्यांचं निरीक्षण दांडग असत. स्वभावाप्रमाणे त्या आपल्या जोडीदारावर पूर्ण लक्ष ठेवून असतात. कारण समोरच्या बद्दल शंका घेण्यास या व्यक्ती पटाईत असतात.

धनु रास

धनु राशीची लोक जोडीदाराला स्पेस देत नाही. त्यांच्या दृष्टीने गोपनीयतेचा अर्थ निरर्थक आहे. त्यांना त्यांच्या जोडीदारावर सतत लक्षात ठेवायचं असतं. जोडीदारने त्यांना छोट्यातील छोटी गोष्ट सांगायला हवी असं त्यांचं मत असतं. त्यामुळे या राशीच्या लोकांसोबत जमवून घेणं सुद्धा कधीकधी थोडं कठीण होऊन बसत.

मित्रानो या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here