आज सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी… इथे काढा स्वस्तिक श्रीगणेशांच्या कृपेने होईल धनलाभ, घर सुख समृद्धीने भरेल…

0
389

मस्कार मित्रांनो,

मित्रांनो 27 जुलै म्हणजे आज मंगळवार च्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत. कुठलेही शुभ कार्य करण्याआधी आपण श्री गणेशांची पूजा करतो. यामुळे आपले कार्य सिद्धीस जाते.

श्री गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार आपल्या मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. श्री गणेश हे बुद्धी दाता आहेत. मित्रांनो तुम्हाला जीवनात सफलता प्राप्त करायची असेल तर त्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत अवश्य केले पाहिजे.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर श्री गणेशाची पूजा आराधना करावी. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. धूप , अगरबत्ती लावून पूजा अर्चा करावी. गणेशाला प्रिय असणारे जास्वंदीचे फुल अर्पण करावे.

जर तुम्हाला जास्वदांचे फुल अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणतेही लाल रंगाचे फुल श्री गणेशांना अर्पण करू शकता. तुपाचा दिवा प्रजवलीत करा आणि पूजा झाल्या नंतर श्री गणेशांना मोदकाचा नैवैद्य दाखवा.

तुम्ही 11, 21, 51 असे कितीही मोदक नैवैद्य म्हणून दाखवू शकता. त्यानंतर परिवारासहित स्वतः देखील हा नैवैद्य प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. मित्रांनो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक विशेष उपाय आपल्याला करायचा आहे.

मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा श्री गणेशाच्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाहीये. तुळशीची पाने श्री गणेशांना अर्पण करू नयेत. सोबतच गणेशाच्या पाठीचे दर्शन म्हणजे मागच्या बाजूने दर्शन घेऊ नये.

श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला विड्याच पान घ्यायचं आहे आणि त्यावर कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचा आहे.

असे स्वस्तिक काढलेले पान श्री गणेशांना अर्पण करायचे आहे. विड्याचे पान घेताना ते अखंड असावे, तुटलेले नसावे. त्याचा देठ देखील अखंड असावा याची काळजी आपण अवश्य घ्या.

असे अखंड पान घेऊन थोडे पाणी कुंकवाचा मिक्स करून त्या पानावर स्वस्तिक आपल्याला काढायचा आहे. आणि हे पान नैवेद्य दाखवल्यानंतर श्री गणराया चरणी अर्पण करायचं आहे.

सोबतच श्री गणेशा चरणी अशी प्रार्थना करायची आहे कि माझ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात. घरात सुख समृद्धी आणि शांती नांदावी.

श्री गणेशाला नमस्कार करून अत्यंत श्रद्धा आणि भक्ती भावाने आपण हा उपाय करायचा आहे. या उपायांच्या प्रभावाने तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील.

पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. हा उपाय केल्यानंतर कधी दिवसांमध्येच तुमच्या मनातील इच्छा, पैशाच्या अडचणी दूर होतील.

घरामध्ये अनेक मार्गानी पैसा येईल लागेल. मित्रांनो तुम्हाला सुद्धा आयुष्यात अशा काही अडचणी असतील तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले काय राव हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा काय राव पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here