नमस्कार मित्रांनो
मित्रानो आचार्य चाणक्य म्हणतात राखेने घासल्यावर पितळ ही चमकत, तांबे चिंचेणे स्वच्छ होते, नदी वाहत राहिली तर स्वच्छ राहते. राजा, ब्राह्मण, योगी, तपस्वी जेव्हा दुसऱ्या देशात जातात तेव्हा आदर प्राप्त करतात आणि स्त्री जेव्हा भटकते तेव्हा बरबाद होते.
धनवान व्यक्तीचे खूप मित्र असतात, आणि पैसे असणाऱ्यांचाच आदर केला जातो. सर्वशक्तिमान असणार्याच्या इच्छेनुसारच बुद्धी काम करते, तोच कर्म नियंत्रित करतो, त्याच्याच इच्छेनुसार आसपासचे मदत करण्यासाठी येतात.
आचार्य चाणक्य सांगतात काळ कधीच कोणाचा चुकला नाही न त्याला कोणी जिंकू ही शकत नाही. जे जन्मापासून आंधळे आहेत ते बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे जे वासनेचे अधीन आहेत ते पण बघू शकत नाहीत.
अहंकारी व्यक्तीला कधीच अस वाटत नाही की तो वाईट किंवा चुकीचं करत आहे आणि जे पैशाच्या मागे आहेत त्यांना आपले कर्म चुकीचे वाटत नाही. आचार्य चाणक्य सांगतात राजाच्या इथे काम करणाऱ्या पुजारीला राजाचे पाप लागते. तर पत्नीला पतीचे पाप लागते, गुरूला त्याच्या शिष्याचे पाप लागते.
आपल्याच घरात व्यक्तीचे शत्रू असू शकतात. जो पाप करतो तो नेहमी कर्जात बुडालेला असतो. आचार्य चाणक्य सांगतात एका लालची व्यक्तीला घर भेट देऊन संतुष्ट करा, कठोर व्यक्तीला हात जोडून संतुष्ट करा, एक विद्वान व्यक्तीला खरे बोलून संतुष्ट करा.
एका बेकार राज्याचे राजा होण्यापेक्षा तो व्यक्ती राजा नसलेला चांगला. एखाद्या पापीचा मित्र होण्यापेक्षा मित्र नसलेला बरा. एखाद्या मूर्खाचा गुरू होण्यापेक्षा शिष्य नसलेला बरा, वाईट पत्नी असण्यापेक्षा पत्नी नसलेली बरी.
सकाळी उठून हाताचे दोन्ही तळवे पहा
शास्त्रानुसार तळहाताच्या पुढच्या भागात लक्ष्मीचा, मध्यभागी सरस्वतीचा आणि मुळाच्या भागात विष्णूचा वास असल्याचे सांगितले आहे. यामुळेच सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे एकत्र दिसले पाहिजेत. असे केल्याने सर्व देवी-देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात कधीही कोणतीही अडचण येणार नाही.
आचार्य चाणक्य म्हणतात एका बेकार राज्यात लोक सुखी कसे असणार, एखाद्या पापी कडून शांतीची प्राप्ती कशी होईल. वाईट पत्नीसोबत घरामध्ये कोणते सुख मिळेल. एखाद्या नालायक शिष्याला शिक्षा दिल्यानंतर किर्ती कशी मिळेल.
आचार्य कोणावरही सहजपणे विश्वास ठेवू नका. खूप भूक लागली असेल आणि खायला काही नसेल तरी संतुष्ट राहा, गाढ झोपेत असाल तरी क्षणात उठा, आपल्या स्वामी प्रति इमानदार राहा. स्वतःचे ओझे स्वतः उचला, ऊन वारा पाऊस यांची चिंता करू नका. नेहमी संतुष्ट राहा.
जो व्यक्ती या गोष्टी अंमल करेल तो आयुष्यात नक्की सफल होतो. आचार्य चाणक्य सांगतात एका बुद्धिमान व्यक्तीने या गोष्टी कोणालाही सांगू नये, की त्याची संपत्ती गेली आहे, त्याला राग आला असेल, त्याच्या पत्नीने चुकीचा व्यवहार केला असेल, लोकांनी त्याला शिव्या दिल्या असतील, तो बेइज्जत झाला असेल या गोष्टी कोणालाही सांगू नये.
पुढे आचार्य चाणक्य सांगतात जो व्यक्ती आर्थिक व्यवहार करण्यास, ज्ञान घेण्यास, खाण्यास, काम धंदा करण्यास लाजत नाही तो नेहमी सुखी राहतो. नेहमी आपल्या पत्नीसोबत संतुष्ट राहिले पाहिजे. देवाचे नामसमरण करण्यास कधीच विसरू नका.
अग्नी, अध्यात्मिक गुरू, ब्राह्मण, गाय, कुमारिका, मोठा माणूस आणि लहान बाळ या लोकांपासून आपले पाय लांब ठेवा. पुढे आचार्य चाणक्य सांगतात हत्तीपासून हजार गज लांब रहा, घोड्यापासून 100 गज आणि शिंग असणाऱ्या जनावरांपासून 10 गज लांब रहा. दुष्ट व्यक्ती असेल त्या जागेवरून निघूनच जा.
आचार्य चाणक्य सांगतात मनात प्रेम असले पाहिजे, ज्याप्रमाणे फुलांमध्ये सुवास असतो, उसामध्ये गुळ असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती मध्ये परमात्मा असतो. आपण ज्या प्रमाणे अन्न ग्रहण करतो त्या सारखेच विचार उत्पन्न होतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.