नमस्कार मित्रांनो
मित्रानो आचार्य चाणक्य यांनी महत्वपूर्ण उपदेश देत असताना सांगितले आहे की मनुष्याने सकाळी उठल्यानंतर या तीन लोकांचा चेहरा कधीच पाहू नये नाहीतर त्याला आयुष्यभर गरिबीत जीवन जगायला लागू शकते. चाणक्य यांच्यानुसार संसारात असे मनुष्य असतात ज्यांच्यात खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली असते.
जर कोणी आपल्या दिवसाची सुरुवात या तीन लोकांचा चेहरा पाहून करत असेल तर त्याच्या जीवनात दुर्भाग्यच येईल आणि तो कधीच उन्नती करू शकत नाही. तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. चाणक्य यांच्या नीती संसारातील सर्वश्रेष्ठ नीती पैकी एक आहे.
कोणीही साधरण मनुष्य चाणक्य नीती वाचून मोठ्यातील मोठे यश मिळवू शकतो. जर तुम्हीही तुमच्या आयुष्यात निराश असाल, कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसेल तर तुम्ही चाणक्य नीतीचे अध्ययन अवश्य करा. चाणक्य यांच्यानुसार मनुष्याच्या सर्व समस्यांचे समाधान त्याच्या आतच स्थित असते.
त्याला गरज आहे ती फक्त स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची. जेव्हा कधी तुम्ही कठीण समस्येमध्ये असाल, तर रात्री आपल्या मनाला सतत त्या समस्येमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुमचे अंतर्मन आपोआपच तुम्हाला त्या कठीण समस्येतून बाहेर काढेल. आपल्याला फक्त आपल्या मनाला समजावून सांगायचे आहे.
आपण जे काम करतो, ज्या गोष्टी बघत असतो त्याचा परिणाम आपल्या अंतर्मनावर होतो. आपले अंतर्मन त्याचप्रमाणे आपल्याला बनवते. जर तुम्ही नेहमी अशा लोकांनी घेरलेले असाल, जे नेहमी नकारात्मक बोलत असतात तर आपले अंतर्मन ही त्यासारखेच बनत जाईल. याउलट जर तुम्ही एखाद्या बुद्धिमान व्यक्तींसोबत राहत असाल तर आपले अंतर्मन आपल्याला त्याप्रमाणेच बनवेल.
म्हणूनच आपण सकाळी उठल्यावर ज्या गोष्टीचे दर्शन घेतो त्याचा परिणाम आपल्यावर होतो. कारण सकाळी सकाळी आपले मन खुपच ऊर्जेने भरलेले असते ते काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा वेळेत जर आपण काही चुकीचे बघितले तर त्याचा चुकीचा परिणाम आपल्या मनावर होतो.
म्हणून आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती मध्ये सकाळी उठल्यावर तीन प्रकारच्या लोकांचा चेहरा बघू नये असं सांगितलं आहे. या तीन लोकांचा चेहरा बघितल्याने मनुष्याच्या जीवनात दुर्भाग्य येते. चला तर मग जाणून घेऊया की आपण सकाळी उठल्यावर काय बघितले पाहिजे.
हाताचे दर्शन
शास्त्रानुसार मनुष्याला सकाळी उठल्यावर पहिले आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे आणि आपले आराध्य दैवत किंवा आपली एखादी इच्छा असेल तर त्याचे नामस्मरण केले पाहिजे.
सकाळी अस केल्याने तुमचे अंतर्मन त्याच दिशेने कार्य करेल ज्याची तुम्हाला सर्वात जास्त इच्छा आहे. हा एक प्रभावशाली उपाय आहे आणि यामुळे खूप लोकांना फायदा झाला आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर जी इच्छा व्यक्त करता ती एक ना एक दिवस नक्की पूर्ण होते.
झाडे
मनुष्याने सकाळी उठून झाडांचे दर्शन घेतले पाहिजे किंवा तुळशीच्या झाडाचे दर्शन घेतले पाहिजे. अस केल्याने मनाला शांती मिळते आणि व्यक्ती निरोगी जीवन जगतो. सकाळी झाडांचे दर्शन करून स्वतःला निरोगी आणि स्वास्थ्य जीवनाची कामना केल्याने तुम्हाला कोणताही आजार असेल तर त्यापासुन मुक्ती मिळेल.
प्रिय व्यक्तीचे दर्शन
सकाळी उठल्यावर सर्वात आधी प्रिय व्यक्तीचा चेहरा बघितला पाहिजे मग ते आई वडील असो, मुलगा असो किंवा मुलगी असो. सकाळी आई वडिलांचे दर्शन करून त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. अस केल्याने तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडतो व त्यांचे जीवन सुखमय होते.
सकाळी उठल्यावर कोणाचे तोंड पाहू नये –
1) चारित्र्यहीन व्यक्ती
सकाळी उठल्यावर कधीच कामुक किंवा चारित्र्यहीन व्यक्तीचे मुख कधीच पाहू नये. ज्या स्त्रीचे अन्य पुरुषांसोबत संबंध असतील तर अशा स्त्रीचे मुख सकाळी सकाळी कधीच पाहू नये.
नाहीतर तुमच्या जीवनात दुर्भाग्य येते. चारित्र्यहीन स्त्रीला बघितल्यावर दिवसभर काम वासना जागृत होते आणि आपण दुसऱ्या स्त्रियांनाही त्याच नजरेने पाहतो. जर एखादी स्त्री अशा स्त्रीला पाहत असेल तर ती ही हळू हळू तशीच बनत जाते.
2) क्रोधी व्यक्ती
सकाळी सकाळी क्रोधी व्यक्तीचा चेहरा पाहणे अशुभ मानले गेले आहे. हे लोक मनात राग, द्वेष यासारखे दुर्गुण उत्पन्न करतात आणि तुम्हाला ही क्रोधी बनवू शकतात. हळू हळू हा स्वभाव तुमच्या अंतर्मनात प्रवेश करतो आणि तुम्ही आपल्यासोबतही क्रूरतेने वागाल, तुमच्यातून प्रेम कमी होईल म्हणून सकाळी उठून अशा व्यक्तींचा चेहरा पाहू नका.
3) खोटं बोलणारी व्यक्ती
सकाळी उठून कधीही खोट बोलणाऱ्या व्यक्तीचे तोंड पाहू नये असं केल्याने तुम्हाला ही खोटं बोलायची सवय लागेल व हळू हळू तुम्हाला ही खोटं बोलण्याची सवय लागेल म्हणून अशा लोकांचे तोंड कधीही पाहू नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.