दररोज सकाळी तोंडात ‘हे’ ठेवा नेहमी पैशांत खेळालं

0
4502

नमस्कार मित्रानो

मित्रानो जर तुमच्या जीवनात गरीबी आहे, पैसा येत नाही ,कोणत्याही कामात यश मिळत नाही , अगदी काही लोकांच अर्ध्य आयुष्य संपत आलं मात्र यश मिळालेलं नाही. घरात गरिबीच आहे , हातावरती पोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करताय तितका पैसा मिळत नाही. अशा वेळी आपल्या काही सवयी तुम्ही नक्की बदला.

आज आपण अशी वस्तू पाहणार आहोत कि जी आपण दररोज सकाळी आपल्या तोंडात टाकली तर मित्रानो ही लक्ष्मी प्रधान वस्तू लक्ष्मी आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणते. लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते.

तंत्र-मंत्र शास्त्रात लवंग , विलायची, लिंबू अशा अनेक वस्तूंचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो. या वस्तू अशा असतात कि ज्या आपल्या विचारांना वास्तवा मध्ये उतरवण्याच कार्य करत असतात. मित्रानो हा उपाय तुम्ही दररोज केला तरी चालेल.

विशेष करून जर पोर्णिमा तिथी असेल अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार जो लक्ष्मीचा वार मानला जातो त्या दिवशी करावा. दररोज केला तर अतिउत्तम आहे. हा उपाय केल्याने जीवनात पैसा येऊ लागतो , गरिबी दूर होते , तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करताय त्यात तुम्हाला यश मिळू लागत.

सतत तुमच्या खिशात पैसा खेळू लागेल. मित्रानो आम्ही वारंवार सांगत आलोय कि कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने , आस्थेने आणि विश्वासाने केला तरच त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. अगदी तोच नियम या ठिकाणी देखील लागू पडतो.

मनामध्ये कोणताही किंतु परंतु न आणता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक सर्वजण करतात ती म्हणजे आपण करत असलेल्या उपायांबद्दल कोणाकडे सुद्धा वाच्यता करू नका , कोणालाही सांगू नका. उपाय आपल्याला गपचूप करायचा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हा तोडगा कराल आणि त्यानंतर तुमच्याकडे पैसा येऊ लागेल तेव्हा आनंदाच्या भरात चुकूनही आपला पैसा लोकांना दिसू देऊ नका. बऱ्याच जणांनी हा उपाय केला पैसा देखील आला पण तो या चुका केल्यामुळे टिकून राहिला नाही. तर तुम्ही मात्र या गोष्टींची काळजी घ्या.

मित्रानो पैशाला सुद्धा नजर लागते जशी आपल्या घरातील लहान मुलांना नजर लागते , कधी कधी मोठ्या माणसांना देखील नजर लागते त्याचप्रमाणे पैसा हि लक्ष्मी आहे. जेव्हा तुम्ही तिचे उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच लागते.

उपाय करण्यासाठी आपण एका लक्ष्मी प्रधान वस्तूचा वापर करणार आहोत आणि ती वस्तू म्हणजे विलायची. दोन प्रकारच्या विलायची असतात. एक असते हिरव्या रंगाची आणि दुसरी म्हणजे विटकरी रंगाची. आजचा उपाय करण्यासाठी आपण हिरव्या विलायचीचा वापर करणार आहोत.

मित्रानो तुम्ही पाहिले असेल कि काही लोकांना विलायची युक्त पदार्थ चघळण्याची सवय असते किंवा काही लोक विलायची चघळत असतात. अशा लोकांकडे तुम्ही पहा भरपूर पैसा येतो. तुम्ही बारीक निरीक्षण करा.

हि माहिती ऐकून बरेच जण विलायची चघळायला सूरवात करतील. सुरवात केली तर अतिउत्तम. तुमच्या चहा मध्ये विलायची वापरा , शिऱ्या मध्ये विलायची घाला. तुम्हाला दिसू लागेल कि आपल्याकडे पैसा येऊ लागला आहे.

मात्र फक्त विलायची खाऊन चालणार नाही तर एक विधी आहे ती सुद्धा आपल्याला करायची आहे. मित्रानो सकाळी उठल्यावर स्नान आदी उरकून एका वस्त्रावर उत्तरेकडे मुख करून बसायचं आहे. देवपूजा करून बसलात तरी चालेल.

जर तुम्ही महिला असाल तर आपल्या डाव्या हातात तीन हिरव्या रंगाच्या विलायची घ्यायच्या आहेत. तिन्ही विलायची फुटलेल्या , तुटलेल्या नसतील याची काळजी घ्या. विलायची ताजी असावी. सुकून गेलेली , वाळलेली विलायची घेऊ नका.

तुम्ही जर पुरुष असाल तर तीन विलायची उजव्या हातात घ्यायच्या आहेत. मूठ घट्ट बंद करून घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त वेळा श्रीम श्रीम श्रीम या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे.

१०८ वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यापेक्षा जास्त म्हटलात तरी हरकत नाही. या विलायची मध्ये आपल्या इच्छा , मनोकामना सामाईक होतात अभिमंत्रित होतात. आणि मग दिवसभरात सकाळी एक विलायची आपल्या तोंडात टाकून चघळत रहा.

सकाळी एक विलायची, दुसरी दुपारी आणि तिसरी तिन्ही सांजेला चघळून चावा. आता जेव्हा तुम्ही विलायची थुंकाल तेव्हा उत्तरेकडे पाहून थुंकायचं आहे. लक्षात घ्या जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा मनामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे विचार असुद्या.

माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे , मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे , लक्ष्मीची माझ्यावर सातत्याने कृपा होणार आहे असे विचार आपण मनात ठेवत चला आणि विलायचीचा रोजच्या जीवनात सुद्धा जास्त वापर करत चला…श्री स्वामी समर्थ

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here