सकाळी उठल्याबरोबर या 4 गोष्टी पाहू नका, पैसा कधीच टिकणार नाही. दारिद्र्य कायम राहील…

0
51

नमस्कार मित्रांनो

मित्रानो सकाळी उठल्याबरोबर काही कामे करणे वास्तुशास्त्रात निषिद्ध आहे. असे मानले जाते की या गोष्टी केल्याने पैशाचा ओघ कमी होतो. अनेकदा वडीलधारी मंडळी अशा गोष्टींचा उल्लेख करतात, ज्याकडे तरुण पिढीचे लक्ष कमी असते.

सकाळी उठल्यावर काय करावे आणि काय नाही हा वडीलधाऱ्यांचा सल्ला जरी ऐकला नाही तरी तुम्हाला माहित आहे का की वास्तुमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत जे तुमचे भाग्य उजळवू हि शकतात आणि बिघडवू हि शकतात.

सकाळी उठून वास्तुशास्त्रात काही गोष्टी पाहणे अशुभ मानले जाते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या सकाळी उठल्याबरोबर टाळल्या पाहिजेत.

वन्य प्राण्यांची चित्रे

बरेच लोक आपल्या घरात हिंसक प्राणी किंवा प्राण्यांची छायाचित्रे ठेवतात, जी सकाळी उठल्याबरोबर समोरच भिंतीवर लटकवलेली दिसतात. पण सकाळी उठल्याबरोबर ही चित्रे पाहणे टाळावे.

सावली

सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली अजिबात पाहू नये. त्यातल्या त्यात पश्चिम दिशेला सावली दिसणे अत्यंत अशुभ मानले जाते.

खरकटी भांडी

वास्तूनुसार सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी पाहू नयेत. असे होऊ नये यासाठी वास्तू शास्त्रात रात्रीच्या वेळी खरकटी भांडी ठेवू नयेत असा सल्ला दिलेला आहे. रात्रीच्या वेळी सर्व भांडी स्वच्छ धुवून पुसून ठेवावीत असे सांगितले आहे.

आरसा

सकाळी उठल्यावर आरसा पाहू नये. असे म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहिल्यास रात्रभर नकारात्मकता शरीरात राहते. त्यामुळे वाईट स्वप्न पडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून सकाळी उठल्या बरोबर आरशाचे दर्शन घेऊ नये.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर स्वतःच्या हाताचे तळवे पहावे. असे मानले जाते की सरस्वती आणि माता लक्ष्मी हाताच्या तळव्यामध्ये वास करतात. तळव्यांकडे बघत देवाचे नाव घ्यावे आणि नंतर चेहऱ्याला लावावे.

यानंतर सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे. जे लोक सूर्योदयापूर्वी उठतात ते चंद्राचे देखील दर्शन घेऊ शकतात. असे मानले जाते की असे केल्याने घरात धन येते आणि बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here