नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मशास्त्रात रुद्राक्ष अत्यंत पवित्र ,मानले गेले आहे. रुद्राक्षात भगवान शिव वास करतात असे मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्याबाबत शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या प्रसंगी चुकूनही रुद्राक्ष धारण करू नये.
मित्रानो पूर्ण जगभरात श्रावण महिन्यात भगवान शंकरांची सर्वात जास्त पूजा केली जाते. श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करताना शिवमंत्रांचा सतत जप केला जातो.
शिवमंत्राचा जप करताना रुद्राक्ष माळेचा विशेष उपयोग होतो. सनातन धर्मात रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. रुद्राक्ष हा भगवान भोलेनाथाचा अंश मानला जातो. शास्त्रात रुद्राक्ष धारण करून मंत्रोच्चार करणे अत्यंत लाभदायक मानले गेले आहे.
रुद्राक्ष धारण केल्याने काय फायदा होतो ?
रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे मन शांत राहते. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील अशुभ ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्यासाठी रुद्राक्षाचे मणी देखील महत्त्वाचे मानले जातात.
परंतु रुद्राक्ष धारण करणार्याने काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम समोर येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया रुद्राक्ष कोणासाठी वर्ज्य आहे आणि कोणत्या प्रसंगी धारण करू नये?
झोपताना रुद्राक्ष धारण करू नये
शास्त्रानुसार जेव्हाही तुम्ही झोपायला जाल त्या वेळी रुद्राक्ष धारण करू नये. झोपण्यापूर्वी गळ्यातील रुद्राक्ष काढून सोबत ठेवावे पण परिधान करू नये. असे केल्याने मन शांत राहते आणि वाईट स्वप्ने पडत नाहीत. असे मानले जाते की झोपेत शरीरात काही अशुद्धता येतात त्यामुळे रुद्राक्षाच्या शुद्धतेवर परिणाम होतो.
अंत्ययात्रेत रुद्राक्ष धारण करू नये
जर कोणाचा मृत्यू झाला असेल आणि तुम्ही त्याच्या अंत्ययात्रेत जात असाल तर रुद्राक्ष काढून ठेवावा. स्मशानभूमीत अंतिम संस्कार करताना रुद्राक्ष धारण करणे वर्ज्य मानले जाते. यामुळे रुद्राक्ष अपवित्र होते आणि जीवनात संकटे येऊ लागतात.
मुलाच्या जन्मावर रुद्राक्ष धारण करू नये
हिंदू धर्मात मूल झाल्यावर सुतक पाळले जाते. बाळाच्या जन्मानंतर काही दिवस वस्तू अपवित्र राहतात, असा समज आहे. अशा स्थितीत जन्मा नंतर ज्या खोलीत बाळ आणि आई असेल तेथे रुद्राक्ष धारण करणे टाळावे.
मांस आणि मद्य सेवन करताना
रुद्राक्ष हे शिवाचे नैवेद्य मानले जाते. अशा परिस्थितीत, त्याच्या शुद्धतेची नेहमी काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर मांसाहार करताना आणि मद्यपान करताना रुद्राक्ष धारण करू नका. यामुळे रुद्राक्षाची शुद्धता ,पवित्रता भंग पावते आणि व्यक्तीला विपरीत परिणाम भोगावे लागतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.