नमस्कार मित्रांनो
मित्रांनो सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा शनिवार 28 जानेवारी रोजी रथसप्तमी आहे. भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानलेले आहे.
मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी-कुंकू समारंभ रथसप्तमीदिनी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते.
मित्रानो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या घरात देवी सरस्वती वास करते त्या घरात अशांतता, दु:ख, पराजय नसते. म्हणूनच माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही जरूर करा मोराच्या पिसाचा हा खास उपाय करा. वास्तुशास्त्रानुसार रथसप्तमीच्या दिवशी मोराच्या पिसांचा उपाय केल्याने देवी सरस्वती घरात वास करते. चला तर मग जाणून घेऊया मोराच्या पिसांसंबंधीचे उपाय.
मित्रांनो, वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रात मोराच्या पिसाचे अनेक महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, मोराचे पंख घरातील शांती आणि आनंदासाठी खूप उपयुक्त वस्तू आहेत.
शास्त्रामध्ये याला एक प्रकारचे साधन म्हटले आहे जे धन आकर्षित करते. मोरपंख घरामध्ये योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास घरामध्ये धनाची प्राप्ती होते.
मोराची पिसे घरात ठेवल्याने पैशाची आवक अनेक पटींनी वाढते. यासाठी तुम्हाला फक्त तीन मोराची पिसे घ्यावी लागतील आणि त्यासंबंधीचे महत्त्वाचे वास्तु उपाय करावे लागतील. ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, म्हणूनच ही महत्त्वाची माहिती तुम्ही पूर्णपणे वाचा.
जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही गणेशाची मूर्ती तुमच्या मुख्य दरवाजाच्या वर ठेवावी आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला मोराची पिसे ठेवावीत.
यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. जर तुमचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध असेल तर तुम्ही मुख्य दरवाजावर मोराची तीन पिसे ठेवावी, यामुळे वास्तुदोष दूर होतील.
घरातील सदस्यांवर ग्रहांचा अशुभ प्रभाव पडत असेल किंवा ग्रहांची स्थिती खराब असेल तर मोराचे पिसे घेऊन त्यावर गंगेचे पाणी किंवा शुद्ध पाणी शिंपडावे आणि ते घरात अशा ठिकाणी ठेवावे जिथे बाहेरील व्यक्तीची त्या मोरपिसावर नजर पडणार नाही. यामुळे ग्रह शांत होण्यास मदत होते.
घरातील एखाद्या सदस्याला किंवा मुलाला वाईट नजर लागली असेल किंवा कुणाच्या वाईट नजरेचा त्रास झाला असेल तर त्या व्यक्तीच्या उशीखाली झोपताना मोराचे पंख ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडा किंवा विहिरीत टाका, वाईट नजर दूर होते.
जर घरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आवडत नसेल, त्यांची स्मरणशक्ती कमकुवत असेल, अभ्यास करताना त्यांना पुन्हा पुन्हा झोप येत असेल, तर विद्यार्थ्यांनी माता सरस्वतीसमोर मोराचे पंख ठेवून त्याची पूजा करावी. दुसर्या दिवशी मोराची पिसे पुस्तकात ठेवावीत. यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल आणि माता सरस्वतीची कृपा होते.
जर शत्रू तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल आणि तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या डोक्यावर मोराचा पीस सिंदूर लावून लावावा. असे केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.