रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट देऊ नका या 6 वस्तू आयुष्यभर पश्चात्ताप होईल

नमस्कार मित्रानो

मित्रानो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने ओवाळते आणि त्याच्या हातावर राखी बांधते. भाऊ सुद्धा तीच रक्षण करण्याचं अभिवचन बहिणीला देतो.

दरवर्षी नारळी पौर्णिमेस हा रक्षाबंधनाचा सण संपूर्ण भारतवर्षात साजरा केला जातो. या रक्षाबंधनाच्या दिवशी अलीकडच्या काळात एकमेकांना महागड्या भेटवस्तू देण्याची प्रथा निर्माण झाल्याची दिसून येते.

भाऊ आपल्या वाहिनीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या बहिणीला काही ना काही भेटवस्तू देत असतो. तर बहीण सुद्धा भावाला काहीतरी भेट देताना दिसून येते. अशात हिंदुशास्त्राप्रमाणे काही भेटवस्तू देण्यास मनाई केलेली आहे.

या भेटवस्तूंची अदानप्रदान करणाऱ्या देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांच्याही घरात अनेक प्रकारची संकटे निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू म्हणून देऊ नये.

काळ्या रंगाचे कपडे / वस्त्र

मित्रानो यामध्ये साडी असेल , ड्रेस असेल किंवा कोणतेही काळ्या रंगाचे वस्त्र असेल. काळा रंग हा अशुभतेच प्रतीक आहे. काळ्या रंगाचं अदानप्रदान मंगल प्रसंगी केल्यास बहीण आणि भाऊ दोघांच्या आयुष्यात नकारात्मकता पसरवत. त्यांच्या जीवनात चांगल्या असलेल्या गोष्टींमध्ये विघ्न निर्माण होतात.

चप्पल किंवा बूट

मित्रानो कोणत्याही प्रकारची पादत्राण जी आपण आपल्या पायात घालतो ती या दिवशी भेट म्हणून देऊ नये. या वस्तूंचं आदानप्रदान केल्यास बहीण भावांमधील संबंध बिघडतात. बहीण भावाच्या प्रेमाला नजर लागते आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

घड्याळ

मित्रानो जी वस्तू वेळ दर्शवते. जसे कि घड्याळ , कॅलेंडर. जर भावाच्या आयुष्यात सर्व काही चांगलं चालू असेल आणि त्याने बहिणीला एखाद घड्याळ गिफ्ट म्हणून दिल्यास त्याची चांगली चाललेली वेळ हि वाईट वेळेत परावर्तित होते. तर बहिणीच्या बाबतीत देखील अगदी असेच घडू शकते.

टोकदार किंवा धारधार वस्तू

यामध्ये कात्री , चाकू , सूरी इत्यादी धारदार वस्तू. मित्रानो अशा धारदार वस्तूंचे अदानप्रदान केल्याने दोघांच्याही घरी हिंसक घडामोडी घडू शकतात. असं कृत्य कि ज्यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. म्हणून धारदार वस्तूंचे अदानप्रदान या दिवशी करू नये.

फोटो फ्रेम

मित्रानो फोटोफ्रेम हि नेहमी आपण स्वतः खरेदी करावी. भावाने किंवा बहिणीने फोटो फ्रेम भेटवस्तू म्हणून देऊ नये.

आरसा

मित्रानो आरसा उर्जेला परावर्तित करतो. त्यामुळे आरसा भेटवस्तू म्हणून दिल्यास नकारात्मक शक्तींचा प्रसार होऊन आयुष्यात वाईट गोष्टी घडून येऊ शकतात. तर मित्रानो या ६ वस्तूंचं अदानप्रदान या शुभ प्रसंगी चुकून देखील करु नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.