नमस्कार मित्रांनो
मित्रानो मनुष्याचे शरीर नाशवंत आहे आणि त्याचा नाश कधी ना कधी नक्कीच होतो. पण आपला आत्मा जो असतो तो कधीच नष्ट होत नाही आणि नियमित रूपाने एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असतो.
आपण कधी असा विचार केला आहे का की एका आत्म्याला एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाण्यास किती वेळ लागतो? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
एक आत्मा जेव्हा आपले शरीर त्याग करतो, तेव्हा त्याला हे समजायला वेळ लागतो की त्याने आता शरीराचा त्याग केला आहे आणि आता त्याला पुढच्या क्रियेसाठी दुसऱ्या शरीराला शोधावे लागेल. ही गोष्ट समजताच तो आत्मा नवीन शरीराच्या शोधात निघून जातो.
अस मानले जाते की एका आत्म्याला दुसरे शरीर लगेच प्राप्त होते. साधारणपणे या मध्ये दोन प्रकारच्या आत्मा येतात. पहिला असतो देवात्मा यालाच आपण देव असेही म्हणतो. ज्यांची आपण पूजा करतो, जस की कुलदेवता.
पुण्य आत्मा म्हणजेच आपले पूर्वज जे आपले संरक्षण करण्यासाठी लढत असतात. पण अशा आत्म्यांना पुनर्जन्म मिळण्यास खूप वेळ लागतो. अशा आत्म्यांना जन्म घेण्यासाठी अशा आईचा गर्भ हवा असतो जी स्वतः अद्भुत असेल.
आता दुसऱ्या आत्म्याबद्दल बोलायचं झालं तर ती म्हणजे शैतानी आत्मा. ज्यांचे पूर्ण जीवन क्रूरता, अन्याय, अत्याचार करत गेलं असेल. अशा शैतानी आत्म्याला पुनर्जन्म घेण्यास जास्त वेळ लागतो कारण त्यांना जन्म घेण्यासाठी अशाच शरीराची गरज असते जो त्याच्या नकारात्मकतेला स्वतःमध्ये जागा देत असेल.
मित्रांनो गरुडपुराणानुसार आपल्या सनातन धर्मात काही असे उपनिषद आहेत की प्रत्येक आत्म्याला दुसरे शरीर धारण करण्यासाठी लागणारा वेळ सांगतात. त्यापैकीच एक आहे बृहदारण्यक उपनिषद. जो दुसरे शरीर धारण करण्यासाठी लागणारा वेळ सांगत असतो.
एका आत्म्याला दुसरे शरीर मिळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, ज्याची कल्पना ही करू शकत नाही पण त्याचबरोबर हे सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला दुसरे शरीर धारण करण्यासाठी तेवढाच वेळ लागतो जितका एका किड्याला एका काठीवरुन दुसऱ्या काठीवर जाण्यास लागतो.
काही ग्रंथांमध्ये तर अस दिले आहे की, जो व्यक्ती आपले आयुष्य चांगले कर्म करतो त्याला कोणताच त्रास न होता मृत्यू येतो आणि अशा आत्म्याला काही वेळातच नवीन शरीर प्राप्त होते.
पुराणांच्या मते जेव्हा कोणतेही शरीर मरते आणि आत्मा शरीर त्याग करून आपली पुढची यात्रा सुरू करतो तेव्हा त्याला तीन प्रकारचे मार्ग दिसतात ते म्हणजे अर्चि मार्ग, धूम मार्ग, उत्पत्ती विनाश मार्ग.
त्यातील अर्चि मार्ग म्हणजेच ब्रह्मलोक व देवलोकांच्या यात्रेसाठी आहे. धूम मार्ग पेत्र लोकांच्या यात्रेसाठी आहे. आणि उत्पत्ती व विनाश मार्गहे नरकाच्या यात्रेसाठी असतात. आता त्या आत्म्याच्या वाट्याला कोणता मार्ग येणार हे फक्त त्याच्या कर्मावर अवलंबून असते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.