नमस्कार मित्रांनो
मित्रांनो गरुड पुराण नुसार एकदा गरुडाने भगवान श्री कृष्ण यांना प्रश्न केला की, कोणत्या व्यक्तीच्या घरात देवतांचा वास नसतो आणि कोणाच्या घरी प्रेत निवास करतात ? तेव्हा मनुष्याला कोणते संकेत मिळतात.?
भगवान श्री कृष्ण यांनी गरुडाला उत्तर देत असताना खूपच रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.
श्रीकृष्ण यांच्या नुसार ज्या घरात प्रेतांचा वास असतो अशा घरात देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही, अशा घरात सदैव दारिद्र्य वास करते.
जर एखाद्या मनुष्याच्या घरी प्रेताचा वास असेल तर त्याला नाना प्रकारचे संकेत मिळतात. हे संकेत त्या घरात असणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून किंवा स्वप्नांच्या माध्यमातून मिळतात.
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात या वस्तू दिसल्या तर समजून जा की त्यांच्या घरात प्रेताचा वास आहे. त्यांचे पूर्वज किंवा प्रिय परिजन हे प्रेत योनीला प्राप्त झाले आहेत आणि प्रेतांचं रूप घेऊन त्यांच्याच घरात निवास करत आहेत.
प्रेताच्या घरी येण्याने काही प्रकारचे संकेत मनुष्याला मिळतात याच कारणामुळे गरुड पुराणामध्ये दिलेले हे उपाय करून प्रेतांपासून सुटका करून घेतली पाहिजे जेणेकरून घरात महालक्ष्मी आणि अन्य देवी देवताचा वास होईल व घरात सुख शांती राहील.
श्री कृष्ण सांगतात या संसारातील समस्त प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते. त्याचप्रकारे प्रेतानाही भोजनाची आवश्यकता असते ते अशा मनुष्याच्या घरात भोजन करतात ज्यांच्या घरात अशुभ कार्य केले जातात.
चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया घरात प्रेत बाधा होण्याचे काय संकेत आहेत. प्रेत कोणत्या घरात भोजन करायला येतात आणि माता लक्ष्मी कोणत्या घरात निवास करतात.
गरुड पुराणानुसार प्रेतांचे भोजन संसारातील समस्त प्राण्यांना निंदनीय होते. प्रेत अशा गोष्टींना खातात ज्याची सर्वजण निंदा करतात. मनुष्याच्या शरीरातील निघालेला कफ, मूत्र आणि मल आणि अन्य प्रकारचे उचिष्ट भोजन हे प्रेताचे भोजन असते.
श्रीकृष्ण सांगतात जे घर अपवित्र असते, ज्यांच्या घरात वस्तू अस्था व्यस्थ पडलेल्या असतात अशा घरात प्रेत येऊन भोजन करतात. ज्यामुळे घरातील वातावरण खराब होते. ज्या घरातील लोक व्रत, उपवास, दान धर्म, पूजा पाठ किंवा नित्य स्नान करत नाहीत अशा घरात प्रेत भोजन करतात.
ज्या घरातील स्त्रिया उशिरा पर्यंत झोपतात , नवरा किंवा वडीलधाऱ्या माणसांचा घरातील स्त्री अपमान करते, ज्या घराचा स्वामी स्त्रियांच्या वश मध्ये गेला असेल आणि तो अनिष्ट कार्य करत असेल अशा व्यक्तीच्या घरात प्रेताचा वास असतो.
ज्या घरात नेहमी लालचं, क्रोध, निद्रा, मद्यपान, आळस या प्रकारचे दुर्गुण असतात तर समजून जा की त्या घरात प्रेताचा वास आहे. अशा घरात देवी लक्ष्मीचा कधीच वास होत नाही त्यामुळे असे लोक नेहमी दुःखी जीवन जगतात. उशीरा पर्यंत झोपणारे आणि स्नान न करणारे लोक पापी असतात.
घरात प्रेत असण्याचे काय संकेत मिळतात ?
भगवान श्री कृष्ण सांगतात भूक आणि तहानेने व्याकूळ होऊन प्रेत योनीला प्राप्त झालेले परीजन आपल्या घरात प्रवेश करतात. ते वायू रुपात असल्याने माणसांना दिसत नाहीत, ते वायू रुपात असल्यामुळेच शरीरात प्रवेश करतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न दाखवतात.
श्रीकृष्ण म्हणतात मेलेले परिजण प्रेत बनून आपली पत्नी, पुत्र, बंधू, बांधव यांच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते त्यांच्या स्वप्नात घोडा, हत्ती, बैल किंवा मनुष्याचे विक्र रूप धारण करून त्यांच्या स्वप्नात दिसायला लागतात.
जर कोणी व्यक्ती झोपून उठल्यानंतर बेड वर स्वतःलाच विकृत अवस्थेत बघतो अर्थात तो झोपत असताना सरळ झोपतो पण उठल्यानंतर त्याचे डोके दुसरीकडे असते अशा अवस्थेत त्याने समजून घेतले पाहिजे की त्याच्या घरात प्रेत बाधा झाली आहे.
जर स्वप्नात एखादा व्यक्ती स्वतःला साखळीने बांधलेले बघतो आणि त्याचे पूर्वज घाणेरड्या कपड्यात बघत असेल किंवा स्वप्नात आपल्या परिजनाना तहानेने व्याकूळ बघतो तर त्याला समजले पाहिजे की त्याचा मेलेला परीजण प्रेत योनीला प्राप्त झाला आहे आणि तो त्याच्या सोबतच त्याच्या घरी रहात आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.