नमस्कार मित्रानो
मित्रानो जे हनुमानजीं चे खरे फक्त आहेत त्यांना हे माहीतच असेल की हनुमानाचा प्रिय वार हा मंगळवार आहे आणि मंगळवारी हनुमानाची पूजा केली जाते.
जर तुम्हाला भगवान हनुमानाची विशेष कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, तुमची प्रत्येक वेळी रक्षा व्हावी अस वाटत असेल, तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या वाईट शक्तींपासून, नकारात्मकतेपासून, रोग, आजार यापासून लांब ठेवावे असावं वाटत असेल तर तुम्ही मंगळवारी भगवान हनुमानाची खऱ्या मनाने पूजा नक्की करा.
कारण या दिवशी भगवान हनुमानाची जो कोणी पूजा करतो, हनुमान चालीसाचा पाठ करतो त्याच्यावर भगवान हनुमान नक्की प्रसन्न होतात. तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान हनुमान संपूर्ण रूपाने आजही पृथ्वीवर उपस्थित आहेत आणि वेळोवेळी भक्तांची रक्षा करण्यासाठी पोहोचतात.
मंगळवारच्या दिवशी काही खास उपाय केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही खास उपाय सांगणार आहे जे मंगळवारच्या दिवशी तुम्ही अवश्य केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया मंगळवारच्या दिवशी तुम्ही काय केले पाहिजे आणि काय नाही.
मंगळवारचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे म्हणून मंगळवारच्या दिवशी काही काम करण्यास वर्जित मानले गेले आहे. काही लोक मंगळवारी नकळत अशी कामे करतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात दुर्भाग्य राहते.
अस म्हणतात की मंगळवारच्या दिवशी राम मंदिरला अवश्य गेले पाहिजे आणि भगवान हनुमानसोबतच राम आणि सीता यांचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. अस केल्याने बजरंगबली तुमची ईच्छा पूर्ण करतात.
मंगळवारच्या दिवशी भोजन वगैरे करण्याआधी हनुमान चालीसा पाठ केल्याने व्यक्तीला बळ, सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी हनुमानाच्या मंदिरात गेले पाहिजे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावून हनुमान चालीसेचे पठण केले पाहिजे. अस म्हणतात की हे केल्याने हनुमान जी मनुष्याचे बिघडलेले काम सुद्धा पूर्ण करतात.
मंगळवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे अस केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. संध्याकाळच्या वेळी पिंपळा जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि भगवान हनुमानाला कष्ट निवारण करण्यासाठी प्रार्थना करा. तुमची प्रत्येक मनोकामना अवश्य पूर्ण होईल.
तस तर गाईला रोज च चपाती खायला घालणे शुभ असते पण मंगळवारच्या दिवशी लाल किंवा तांबड्या गाईला चपाती खायला घालणे खूपच शुभ फलदायी असते.
मंगळवारचा दिवस लाल रंगाशी संबंधित आहे म्हणून शक्य असेल तर मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करा. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी जात असाल तर लाल रंगाची एखादी वस्तू अवश्य जवळ ठेवा. तुम्हाला तुमच्या कार्यात सफलता मिळण्याची संभावना हजार पट वाढते.
मंगळवारी कोणत्या गोष्टी करू नयेत
मंगळवारी उधारीचे घेणं देणं करू नये. मंगळवारी धनाचे घेणं देणं अशुभ मानले गेले आहे. या दिवशी कर्ज घेतल्याने फेडणे अवघड जाते आणि दिलेले धन परत मिळत नाही.
मंगळवारी काळे वस्त्र घालू नका यामुळे शनीचा प्रभाव वाढतो. शनीसोबत मंगळ चा सहयोग खूपच अशुभ आणि कष्टकारी मानले गेले आहे यामुळे मानसिक व शारिरीक कष्टात वृद्धी होते.
मंगळवारच्या दिवशी धारदार वस्तू खरेदी करू नका, या दिवशी धारदार वस्तू खरेदी केल्यास घरात कलह वाढतो. मंगळवारी केस कापू नये आणि दाढी करू नये आणि नखे ही कापू नये.
अस म्हटलं जात की याचा प्रभाव तुमच्या माथ्यावर होतो आणि यामुळे धन आणि बुद्धीची हानी होते. शास्त्रानुसार मंगळवारी केस कापल्याने आठ महिने आयुष्य कमी होते.
मंगळवारी मांसाहार करू नये, ज्योतिषशास्त्रात मंगळवार हा उग्र वार सांगितला आहे अशामध्ये जर तुम्ही मांस, मद्य याचे सेवन केल्यास उग्रता वाढेल आणि याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या पारिवारिक आणि सामाजिक जीवनावर पडेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.