या एका उपायाने मूळव्याध समूळ नष्ट करा….

0
648

नमस्कार मित्रांनो

मित्रानो पाइल्स हा एक सामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. हा रोग गुदाशय आणि गुद्द्वाराशी संबंधीत आहे. जर मूळव्याध होण्याची कारणं जाणून घ्यायची झाली तर हा सहसा बद्धकोष्ठतेमुळे होणारा आजार आहे.

या आजारात शौचास साफ होत नाही त्यामुळे गुदाशय आणि गुदद्वाराच्या भागाच्या नसा फुगतात आणि गाठी तयार होतात. या वाढलेल्या चमड्यामध्ये किंवा गाठींमध्ये वेदना होतात आणि कधीकधी रक्त देखील येते.

मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला अंतर्गत मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाह्य मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो.

या दोन्हींमुळे रुग्णाला रक्तस्त्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. मूळव्याधातून रक्तस्त्राव होण्याचा अर्थ आहे की गुदाशय आणि गुद्द्वारमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे.

कधीकधी ही समस्या स्वतःहून बरी होते पण काहीवेळा लक्ष न दिल्याने समस्या वाढू शकते. मूळव्याधाच्या लक्षणांमध्ये मलविसर्जनाच्या वेळी रक्तस्त्राव, गुदद्वाराला खाज किंवा वेदना, सतत शौचास जाण्याची इच्छा होणे, गुदद्वाराभोवती गाठ येणे किंवा गुदद्वाराभोवती वेदना होणे इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

रक्तस्त्राव मूळव्याधासाठी औषधे उपलब्ध आहेत, पण काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते. तथापि, मूळव्याधासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, जे बरे होण्यास गती देतात आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात.

तर आज आपण असाच एक घरगुती उपाय जाणून घेऊया ज्यामुळे मुळव्याध समूळ नष्ट होईल व तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही. आपण आपल्या आजू बाजूला घाणेरी वनस्पती पाहिली असेल, तिला टंटणी पण म्हणतात.

तर तुम्हाला ही वनस्पती कुठे ही मिळून जाईल. आपल्याला हा उपाय करण्यासाठी घाणेरी वनस्पती लागणार आहे. ज्या व्यक्तींना मूळव्याध झाला आहे त्यांनी या वनस्पतीची 5 किंवा10 पाने घ्या.

10 पाने घेतल्यानंतर 1 ग्लास पाणी घ्या, 5 पाने घेतली तर अर्धा ग्लास पाणी घ्या. नंतर ती उकळून घ्यायची आहेत. उकळून घेतल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे आणि ते पाणी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक कप म्हणजे एक वेळेला एक कप याप्रमाणे सेवन करायचे आहे.

तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. त्याच प्रमाणे तुम्ही या पानांचा डायरेक्ट सुद्धा  उपयोग करू शकता तर तो कसा… याची 5 पाने घ्या कवळी पण अति कवळी नसावी मध्यम स्वरूपाची 5 पाने घ्या. ती 5 पाने रोज सकाळी उपाशी पोटी चावून खायची आहेत आणि यावर अर्धा तास तुम्ही काहीही खायचं नाही.

मूळव्याध मुळातूनच नष्ट करायचा असेल तर तुम्हाला या वनस्पतीची मुळे लागणार आहेत. या घाणेरीची तुम्ही एक 50 ग्रॅम मुळे घ्या (जर तुमचा मूळव्याध मोठा असेल तर 100 ग्रॅम मुळे घ्या) त्यानंतर हे मूळ वाळवा आणि त्याचे चूर्ण बनवा.

त्यानंतर हिरडा चूर्ण घ्या. (तुम्हाला आयुर्वेदिक मेडीकल मध्ये कुठे ही मिळेल). हा उपाय करताना एक चमचा हिरडा चूर्ण घ्या आणि एक चमचा या मुळांचे चूर्ण घ्या आणि एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून मिक्स करा. रोज सकाळी उपाशी पोटी हे तुम्ही सेवन करायचं आहे. जो पर्यंत तुमचा मूळव्याध बरा होत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here