अशा पुरुषाची पत्नी त्याला सोडून दुसऱ्यावर प्रेम करते..

0
9125

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो आज आम्ही तुम्हाला शुक्राचार्य यांनी सांगितलेल्या अशा पुरुषांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या पत्नी त्यांना सोडून दुसऱ्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करतात. अशा पुरुषांना चेतावणी देत या नीतीची रचना केली आहे आणि त्यांना सावधान राहण्यास सांगितले आहे.

शुक्राचार्य हे दानवांचे गुरू होते पण त्यांचे नितीतत्त्व संसारातील श्रेष्ठ नीती तत्व मानले जाते, ज्याचा सन्मान देव ही करत होते. शुक्राचार्य यांनी आपल्या नीती मध्ये एक सेवकापासून ते राजापर्यंत सर्वांसाठी नीती सांगितली आहे.

मित्र आणि शत्रूची ओळख कशी करावी? कोणाला धन देत असताना किंवा कोणाकडून धन घेत असताना कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यावी? धनाची रक्षा कशी करावी आणि धनाच्या वृद्धीसाठी कोणते उपाय करावेत? अशा काही विषयांवर शुक्राचार्य यांनी ज्ञान दिले आहे.

शुक्रनीतीचे अध्ययन करून एक साधारण मनुष्य पण सामर्थ्यशाली, बलवान आणि शत्रूवर विजय मिळवणारा बनू शकतो. जर तुमच्याही आयुष्यात समस्या असतील किंवा कोणी व्यक्ती तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल तसेच कोणी स्त्री तुमचा उपयोग करून घेऊन तुमचा तिरस्कार करत असेल आणि आपले लोक ही परक्या सारखे वागत असतील तर तुम्ही शुक्रनीती जरूर वाचा.

हि नीती तुम्हाला अशा सर्व कठीण परिस्थितीपासून लढण्यास शिकवेल. तुम्ही इतके सक्षम व्हाल की कोणतीही स्त्री अथवा दृष्ट पुरुष तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही आणि तुम्ही लवकरच या नीतीच्या आधारे यशस्वी व्हाल.

शुक्रनीतीमध्ये खासकरून महिलांसाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. शुक्रनीती मध्ये स्त्रियांना सावध करत परपुरुषाशी किंवा परिवारातील अन्य पुरुषांशी कसा व्यवहार करावा याबद्दल सांगितले आहे. दृष्ट स्त्रियांमध्ये हे गुण असतात की त्या अन्य पुरुषासोबत अधिक सहवास करतात.

आज आम्ही तुम्हाला शुक्राचार्य यांनी सांगितलेल्या अशा पुरुषांबद्दल सांगणार आहे जे स्वतःच्या चुकीमुळे आपल्या पतिव्रता पत्नीला गमावून बसतात ज्या कारणाने त्यांची पत्नी त्याच्यापासून लांब होऊन अन्य पुरुषासोबत सहवास करते. इथे शुक्राचार्य यांनी स्त्रियांना दोष न देता पुरुषांनाच अत्यंत मूर्ख आणि दोषी मानले आहे.

अत्यंत क्रोधी

शुक्राचार्य यांच्या नुसार जो पुरुष अत्यंत क्रोधी आहे, पत्नीच्या छोट्या छोट्या गोष्टीवर क्रोध करतो अशा पुरुषांबद्दल ती स्त्री मनापासून प्रेम करत नाही आणि अशा स्त्रीला जर प्रेम करणारा किंवा चिंता करणारा पुरुष मिळाला तर ती स्त्री आपल्या पतीपेक्षा त्या पुरुषावर प्रेम करते. त्यामुळे पतीने जास्त क्रोध करू नये.

नपुंसक

जो पुरुष नपुंसक असल्यासारखा वागत असेल किंवा जो पुरुष आपल्या पत्नीची कामेच्छा पूर्ण करण्यास असमर्थ असेल तर पत्नी अशा पतीपासून विभक्त होते. स्त्रीला नेहमी आपलं बनवून ठेवण्यासाठी तिच्या काम इच्छा पूर्ण करणे आवश्यक असते. पुरुषांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

दंड देणारा

जो पुरुष लहान लहान गोष्टीवर आपल्या पत्नीला मारत असेल किंवा तिच्यासोबत हिंसा करत असेल तर अशा पतीचा ती स्त्री त्याग करणे उचित समजते. पतीचे हे कर्तव्य आहे की त्याने सर्वांसमोर आपल्या पत्नीचा अपमान करू नये व मारू ही नये. यामुळे दोघांमधील प्रेम कमी होऊ शकते व ती स्त्री अन्य पुरुषाला प्रिय मानू शकते.

प्रेम विरहित

जो पुरुष प्रेमळ नसतो, जो पत्नीसोबत प्रेमाने बोलत नाही नेहमी वाईट बोलतो अशा पुरुषावर कोणतीच पत्नी प्रेम करत नाही. पतीने आपल्या पत्नीसोबत प्रेमाने बोलले पाहिजे.

नेहमी प्रवासात राहणारा

जो पुरुष नेहमी आपल्या पत्नीला सोडून प्रवास करत असतो अशा पुरुषाची पत्नी त्याला सोडून दुसऱ्या पुरुषाशी संबंध स्थापित करते. म्हणून आपल्या पत्नीपासून जास्त लांब राहू नका.

निर्धन

जो पुरुष धन कमवण्यासाठी असमर्थ असतो आशा पुरुषांचा त्याग करून स्त्रिया धनवान पुरुषाकडे जातात. म्हणून परिवार खुश ठेवण्यासाठी धन कमावले पाहिजे.

वैश्या वृत्ती

जो पुरुष आपली पत्नी असतानाही वाईट स्त्रियांशी संबंध ठेवतो किंवा अन्य स्त्री सोबत काम क्रीडा करतो अशा पुरुषापासून स्त्रिया विभक्त होतात व दुसऱ्या पुरुषासोबत राहतात. म्हणून पुरुषांनी चुकूनही अन्य स्त्री सोबत नाते ठेऊ नये. शुक्राचार्य यांच्या नुसार प्रत्येक पुरुषाने आपली स्त्री आपल्याला सोडून जाण्याआधी आपले दोष दूर करावेत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here