असा असतो नोव्हेंबर मध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

0
742

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिष शास्त्रात जसे तारीख व वेळेला महत्व दिले गेले आहे तसेच ज्या महिन्यात आपला जन्म झाला आहे त्याला सुद्धा विशेष महत्व प्राप्त आहे. मित्रानो या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती मेहनती , बुद्धिमान व त्यांचा स्वभाव दयाळू असतो.

या व्यक्तींची आंतरिक शक्ती हि खूप जबरदस्त असते. मित्रानो या महिन्यात जन्म घेणाऱ्या लोकांमध्ये कमालीची सहनशक्ती असते. जो पर्यंत यांचा स्वाभिमान दुखावत नाही तोपर्यंत हे लोक प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मित्रांमधली भांडण मिटावी म्हणून हे लोक नेहमी मध्यस्ती करत असतात.

सामान्यतः सर्व लोक तुम्हाला सौम्य व शांत स्वभावाच्या रूपात ओळखतात. परंतु ज्यांनी तुमचा राग पाहिला आहे त्यांनाच माहित आहे कि तुमच्या आत केवढे मोठे वादळ दडलेले आहे. या व्यक्तींच्या बोलण्यात जणू काही जादूच असते. या व्यक्तीना वायफळ बोलायला आवडत नाही. मोजकेच पण कामाचे असे यांचे बोलणे असते.

या महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तीचा खिसा नेहमीच पैशाने भरलेला असतो. म्हणजेच या व्यक्ती नेहमीच बँक बॅलन्स पाळून असतात. या व्यक्तींना पैशांची बचत करायला आवडते व पैसा योग्य ठिकाणीच वापरला जातोय ना याची बारकाईने काळजी हे लोक घेत असतात.

या व्यक्तींना भाग्याची भरपूर प्रमाणात साथ भेटते. त्यामुळे यांना आयुष्यात कधीच धन , दौलत , पैसा यांची कधीच कमतरता भासत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांचा जन्म लोकांचे भले करण्यासाठीच झालेला असतो.

या व्यक्तींना लहान मुलांशी विशेष लळा असतो. हे लोक भूतकाळात झालेल्या गोष्टी कधीच विसरत नाहीत. या व्यक्तींचे मन हे काचेप्रमाणे स्वच्छ , निर्मळ असते. या व्यक्ती वेळेबाबत खूपच कडक शिस्त पाळताना दिसतात. वेळ वाया घालवणे यांच्या तत्वात बसत नाही.

या महिन्यात जन्म घेणारे व्यक्ती कोणतेही काम करताना पूर्ण मेहनतीने आणि मन लावून काम करतात. आपला बेस्ट ते प्रत्येक कार्यात देतात. या व्यक्तींचे करियर जास्त करून पोलीस , न्यायालय , मेडिकल क्षेत्र यांच्याशी जास्त संबंधित असतात. यांच्या मदतीस नेहमीच यांचे मित्र हजर असतात.

या व्यक्तीने जर आपले करियर सर्जन , गुप्तचर , पत्रकार , पोलीस , आर्मी , मेडिकल या क्षेत्रांत केले तर त्यात जे यशस्वी होतात दिसतात. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींचा स्वभाव खूपच भावनिक असतो. भूतकाळ लक्षात ठेवण्यात या मुलींचा हात कोणीच धरू शकत नाही.

या मुली प्रॅक्टिकल असतात तसेच या मुली आतून स्ट्रॉंग असतात. या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा शुभ अंक ७ , ३ , १ असा आहे. शुभ दिवस सोमवार , मंगळवार आणि गुरुवार. या दिवसांत जर यांनी कोणते शुभ कार्य केले तर त्याचे परिणाम सकारात्मक मिळतात.

तसेच यांचा शुभ रंग गुलाबी , पांढरा आणि चॉकलेटी आहे. शुभ रत्न मुन स्टोन , मोती / पर्ल आहे. हे शुभ रत्न तुम्ही घातले तर ते शुभ मानण्यात आले आहेत. यांना सल्ला असा आहे कि यांनी संवाद कुशलता अजून चांगली करावी.

या व्यक्तींनी शनिवारी थोडे तेल घेऊन मोहरीचे तेल असेल तर उत्तमच. त्या तेलात त्यांनी स्वतः चेहरा बघून ते तेल शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात अर्पण करावे. याचे फळ या नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना उत्तम मिळते.

नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांना प्रत्येकाच्या विचारसरणीचा किंवा मताचा पूर्ण आदर असतो. हे लोक इतरांबद्दल कोणताही गैरसमज पाळत नाहीत. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या आयुष्यात कोणाचेही नुकसान करत नाहीत. अनेकदा या लोकांबद्दल इतरांचे गैरसमज होतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here