मृत्यू आधी एका मराठमोळ्या महिलेने तब्ब्ल ७२ कोटींची संपत्ती केली संजय दत्तच्या नावावर. बघा सविस्तर

0
31

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो फॅन्स त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी अशा गोष्टी करतात, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तच्या एका महिला चाहत्याने केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईची रहिवासी असलेल्या निशी हरिश्चंद्र त्रिपाठीने मृत्यूपूर्वी तिची सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती.

यामध्ये 10 कोटींच्या घराचाही समावेश आहे. असे सांगितले जाते की, निशी तिच्या आई आणि कुटुंबासह मुंबईत राहत होती. संजय दत्तला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तोही थक्क झाला. ही संपूर्ण घटना 2018 सालची असल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय दत्तला या घटनेची कोणतीही माहिती नव्हती, त्यानंतर पोलिसांनी त्याला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यावेळी बाबा कोलकाता येथे एका चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना फोनवर सांगितले की, निशी नावाच्या 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ती तुमची मोठी फॅन होती.

यामुळे त्या महिलेने तिची सर्व मालमत्ता तुमच्या नावावर केली आहे. हे ऐकून संजयला खूप आश्चर्य वाटले. वास्तवात तर संजय दत्त कधीच या महिलेला भेटला नाही किंवा तिला ओळखत सुद्धा नव्हता. तेव्हा तो म्हणाला होता, ‘मला धक्का बसला आहे, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत.’

निशीच्या या निर्णयाने तिचे कुटुंबीयही आश्चर्यचकित झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निशीच्या मृत्यूनंतर त्यांचे एक पत्र समोर आले होते. यामध्ये तिने मृत्यूनंतर आपली सर्व मालमत्ता संजय दत्तच्या नावावर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नॉमिनी मध्ये तिने संजयचे नाव व पत्ता दिला होता.

ही घटना समोर आल्यानंतर संजय दत्तला धक्का बसला आणि तो भावूकही झाला. मग तो म्हणाला की मी निशीला ओळखत नाही. पण या गोष्टीने मला खूप भावूक केले आहे. मी तिच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.

तिच्या कुटुंबियांना हे सर्व हक्क मिळाले पाहिजेत. संजय दत्तच्या वकिलाने सांगितले होते की, संजयने चाहत्याच्या कुटुंबाला मदत करण्याची ऑफर दिली आहे.

ते मृत्यूपत्र त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा ज्यांच्या नवे करायची आहे त्या संपूर्ण प्रक्रियेत मदत करतील. याबाबत त्यांनी बँकेला पत्रही लिहिले आहे. निशीच्या कुटुंबीयांना ती मालमत्ता मिळावी, असे संजय शेवटी म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here