नमस्कार मित्रानो
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच निर्जला एकादशी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे म्हटले जाते.
मित्रानो प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येत असतात. एक येते ती कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी हा दिवस विशेष महत्वपूर्ण मानला जातो. निर्जला एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते.
कारण या व्रतामध्ये पाणी पिणे देखील वर्जित मानण्यात आले आहे. म्हणेजच पाणी न पिता हे व्रत केले जाते त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हटले जाते. मान्यता आहे कि या दिवशी व्रत उपवास केल्याने मानवांचीत फळ प्राप्त होते.
या एकादशीला व्रत केल्याने बाकी सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्यफल प्राप्त होते. मित्रानो एकादशीच्या दिवशी शुद्ध अंतकरणाने भगवान विष्णूंची विधी विधान पूर्वक पूजा अर्चा केली जाते. या दिवशी मांस , मदिरेपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
मान्यता आहे कि या दिवशी तांदुळाचा वापर करू नये. तांदुळा ऐवजी तिळाचा वापर करणे शुभ फलदायी मानले जाते. एकादशीच्या दिवशी बिछान्यावर न झोपता जमिनीवर झोपण्याला महत्व प्राप्त आहे.
जेष्ठ शुक्ल पक्ष चित्रा नक्षत्र दिनांक १० जून रोज शुक्रवार निर्जला एकादशी आहे. मित्रानो शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
माता लक्ष्मी सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्तीची दाता मानली जाते आणि एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. मित्रानो भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहेत त्यामुळे ज्यांच्यावर विष्णूंची कृपा बरसते त्यांच्यावर आपोआपच माता लक्ष्मीची कृपा बरसते.
दिनांक १० जून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून एकादशी पासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी अति शुभ फलदायी आणि आनंददायी ठरण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता पर्यंत जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कन्या , तूळ , धनु आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.