श्री कृष्ण म्हणतात मृत्यूच्या एक तास आधी मिळतात हे पाच संकेत.. गरुडपुराण!!

0
1034

नमस्कार मित्रांनो

मित्रानो भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या गीतेमध्ये सांगितले आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यु अवश्य होतोच. परंतु मनुष्य मोह बंधनात अडकल्यामुळे आपल्या मृत्यूला नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो.

पण मृत्यू अटळ आहे हे त्याला त्यावेळी कळत नाही आणि जेव्हा मृत्यू होणार असतो त्यावेळी त्याला स्वतःहून मृत्यू जवळ आला आहे असे समजते. मृत्यूच्या काही वेळ आधी मनुष्याला जाणवते की येणाऱ्या काही वेळातच त्याचा मृत्यू होणार आहे.

मृत्यू येण्याच्या आधी असे काही संकेत दिसू लागतात ज्यामुळे त्या व्यक्तीला कळून जाते की मात्र एका तासा मध्येच आपला मृत्यू होणार आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी असे पाच संकेत सांगितले आहेत ज्यामुळे मनुष्य आपल्या मृत्यू बद्दल माहिती करून घेऊ शकतो.

भगवान श्रीकृष्णाच्या अनुसरे या संकेताच्या माध्यमातून मनुष्य आपल्या मृत्यूची वेळ माहीत करून आपले कुटुंबीय आणि मित्र गणांसोबत अशा गोष्टी बोलू शकतो, ज्या फक्त मृत्यू समीप येता केल्या जातात. चला तर मग फार वेळ न घालवता ते पाच संकेत कोणते आहेत जाणून घेऊयात.

केलेली कर्म दिसणे

भगवान श्रीकृष्ण यांच्या मते ज्या मनुष्याचा मृत्यू होणार आहे, त्या व्यक्तीस सुमारे एक तास आधी आपल्या संपूर्ण जीवनात केलेले सर्व छोटे मोठे कर्म दिसू लागतात. जीवनात केलेले पाप पुण्य तसेच आपले आत्ता आणि नजीकच्या लोकांसोबत घालवलेला वेळ दिसू लागतो.

यामुळे माणूस ध्यान योगाच्या अवस्थेत पोहोचतो. ज्यामध्ये त्याला फक्त आणि फक्त कर्मच दिसू लागतात. त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही.

स्वप्नामध्ये स्वर्ग आणि नरकाचे दरवाजे दिसणे

अशा प्रकारची स्वप्न माणसाला मृत्यूच्या एक दिवस आधीच दिसू लागतात. व्यक्तीस स्वप्नामध्ये स्वर्ग आणि नरक यांचा दरवाजा आळीपाळीने दिसू लागतो. व मनुष्य त्या दरवाजाच्या बाहेर वाट बघत उभा असतो. आत मध्ये काय चालू आहे ते अजिबात दिसत नाही मात्र फक्त बाहेरचे मोठे दरवाजेच दिसतात.

यमराजाचे दूत दिसणे

श्रीकृष्ण यांच्या मते ज्या व्यक्तीचा मृत्यूस मात्र एक प्रहर राहिला आहे त्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूस यमराजाचे दूत असल्याचे जाणवते. मृत्युपूर्वी फक्त 21 सेकंद आधी यमराजाचे दूत स्पष्टपणे दिसतात. अनेकदा या दूतांना पाहून मरणारी व्यक्ती रडू लागते. परंतु त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना याचे कारण समजत नाही.

आपले पूर्वज स्वप्नामध्ये दिसणे

गरुडपुराणानुसार मृत्यू होण्याचा सगळ्यात मोठा संकेत आहे, काही दिवस आधी त्या व्यक्तीचे पूर्वज त्याला स्वप्नात दिसू लागतात. बऱ्याचदा अनेक लोक याला पितृदोष समजण्याची चूक करतात. परंतु पूर्वजांचे अनेकदा वारंवार स्वप्नात येणे मृत्यूचा एक संकेत आहे.

श्रीकृष्ण सांगतात की ज्या व्यक्तीला स्वप्नामध्ये घुबड आणि जळणारी लाकडे दिसतात त्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ निकट आलेली असते. अशा व्यक्तीचा मृत्यु 21 ते 91 दिवसांमध्ये होतो.

अशा व्यक्तींना आपला राहिलेला वेळ आपल्या आप्त लोकांसोबत व्यतीत केला पाहिजे. आयुष्यभर केलेल्या चुकांना सुधारले पाहिजे. स्वप्नात जळणारी लाकडं त्याची अर्थी दर्शवतात तर घुबड त्याचा काळ दर्शवतो की तो जवळच आहे.

असे पाच संकेत दिसू लागल्यास समजून जा मृत्यू निकट आहे. श्रीकृष्ण सांगतात की राहिलेला वेळ अशा व्यक्तींनी केलेल्या चुका सुधारून सत्कर्म करण्यात आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत घालवावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here