नमस्कार मित्रानो
सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावरील तीळ व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि त्याच्या आवडी-निवडी इत्यादींची माहिती मिळते. इतकेच नाही तर तीळ हे देखील दर्शवतात की व्यक्ती किती रोमँटिक आहे.
आपल्या शरीराच्या अनेक भागांवर तीळ असतात. कधी याचा रंग काळा, तपकिरी किंवा लाल असू शकतो. सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या तीळाचे महत्त्व सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया सामुद्रिक शास्त्रानुसार तिळाचे महत्व.
कपाळाच्या मध्यभागी तीळ
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिला किंवा पुरुषांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो, असे लोक आपल्या जोडीदारावर जीव ओवाळून टाकतात. म्हणजेच आपल्या जोडीदाराच्या किंवा प्रियकराच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची ते काळजी घेतात.
वरच्या ओठावर तीळ
जर एखाद्या महिलेच्या वरच्या ओठाच्या वर तीळ असेल तर समुद्रशास्त्रात असे मानले जाते की अशा महिला खूप रोमँटिक असतात. म्हणजेच, अशा स्त्रिया त्यांच्या जोडीदारावर मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवेळी संधी शोधत असतात.
उजव्या डोळ्यात तीळ
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या उजव्या डोळ्यात तीळ असते, त्या महिलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. याव्यतिरिक्त, अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते.
गुडघ्यावर तीळ
जर एखाद्या महिलेच्या गुडघ्यावर तीळ असेल तर तिचा मूड खूप रोमँटिक असतो. समुद्रशास्त्रात उजव्या पायाच्या गुडघ्यावर तीळ दर्शविते की अशा महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून खूप प्रेम आणि आनंद मिळतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.