तुमच्या अंगावर इथे तीळ असेल तर , तुम्ही खूप धनवान होणार. श्री स्वामी समर्थ

0
980

नमस्कार मित्रानो श्री स्वामी समर्थ

मित्रानो आज आम्ही तुम्हाला शरीरावर जन्मापासून जे काळे छोटेसे मार्कस , चिन्ह असतात त्याला आपण तीळ म्हणतो व ज्योतिष शास्त्रानुसार तीळामुळे माणसाचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला तिळाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसे असते या बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत.

जर कोणी त्या व्यक्तीच्या दोन्हीही भुवयांच्या मध्ये तीळ असेल तर ती व्यक्ती खूप हुशार असते. होय हे लोक आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून पैसा प्राप्त करू शकतात. मित्रांनो जर कोणत्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला डोळ्यांच्या कॉर्नरवर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप भावूक असते.

असे लोक दुसऱ्यांवर जळणारे पण असू शकतात. ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर अशी व्यक्ती बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत इतर लोकांच्या तुलनेमध्ये खूप पुढे असते. बौद्धिक कामांमध्ये त्यांना खूप आनंद मिळतो.

ज्यांच्या उजव्या डोळ्याखाली तीळ असतो ती व्यक्ती खूप कामुक असतात. प्रेमाच्या बाबतीत इतरांपेक्षा या व्यक्ती खूप भावूक बसतात आणि दुसऱ्यांना मदत करणे यांना खूप आवडते. ज्या व्यक्तींच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असते ती व्यक्ती स्वभावाने अतिशय गोड असतात, त्यांना समजणे इतरांसाठी कठीण काम असते.

जर कोणी त्या व्यक्तीच्या नाकाच्या सुरुवातीला म्हणजेच समोर मध्यभागी तीळ असेल तर असे लोक कल्पनाशील असतात. हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने करणे पसंत करतात. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याच्या खाली आणि नाकाजवळ तीळ असतो ते लोक खूप मतलबी असतात.

मित्रांनो ज्यांच्या डाव्या डोळ्याच्या अगदी खाली तीळ असेल तर ती व्यक्ती भावनाशील असते. त्यांच्या जोडीदाराला त्यांचा हा स्वभाव खूप आवडतो.ज्यांच्या डाव्या बाजूच्या कॉर्नरवर तीळ असतो ते लोक त्यांच्या जोडीदारासोबत खूप भांडण करतात.

त्याचबरोबर आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला मिळवण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर समजून घ्या ती व्यक्ती डोक्याने खूप फास्ट असते. हे लोक आपल्या कामामध्ये यश मिळवू शकतात.

जर कुणाच्या नाकावर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप प्रवास करणारी असते. अशा व्यक्तींना प्रेम प्रकरणांमध्ये थोड्या समस्या येऊ शकतात. ज्या लोकांच्या ओठांवर डाव्या बाजूला तीळ असते ते लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारे असतात. त्यांच्या उदारपणामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते.

जर कानाच्या टोकावर उजव्या बाजूला तीळ असेल तर ती व्यक्ती खूप कलात्मक असते. हे लोक अनेकदा आपल्या कामाने दुसऱ्यांना धक्का पोहोचवतात. त्यांचे प्रेमप्रकरणे देखील होऊ शकतात. मात्र आपल्या जोडीदाराला समर्पित असतात.उजव्या बाजूला ओठांवर तीळ असेल, तर ती व्यक्ती आपले काम योग्य पद्धतीने पूर्ण करतात.

हे लोक बुद्धिमान असतात आणि त्यांना कल्पनाशक्ती खूप चांगली असते. जर कोणाच्या उजव्या बाजूला ओठांवर अगदी कॉर्नरवर तीळ असेल तर ती व्यक्ती प्रेमळ स्वभावाची असते. जोडीदारासोबत ते खूप प्रामाणिक असतात. कधी कधी त्यांच्या स्वभावात मत्सर निर्माण होतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here