नमस्कार मित्रानो
मित्रानो मिथुन हि राशीचक्रातील तिसरी राशी असून बुध हा वायुतत्वाचा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह आहे. जो अतिशय बुद्धिमान ग्रह मानला जातो. या राशीचे बोधचिन्ह म्हणजे एकमेकांशी संवाद साधत असलेली स्त्री पुरुष जोडपे.
संवाद , बोलणं , प्रचार , प्रसार या सर्वांचा अर्थ या बोथ चिन्हातून आपल्याला ठळकपणे जाणवतो. मित्रानो अगदी तसाच स्वभाव असतो मिथुन राशीच्या मंडळींचा. संवाद साधन , बोलणं हा नैसर्गिक स्थायी स्वभाव जो आहे तो आहे मिथुन राशींच्या मंडळींचा.
हि वायुतत्वाची राशी असल्यामुळे व्यवहारामध्ये अत्यंत हुशार आणि दक्ष समजली जाणारी हि राशी आहे. विविध विषयांची माहिती घ्यायला यांना प्रचंड आवड असते. यांच्याकडे भरपूर माहिती असते , परंतु ज्ञान असेलच असे नाही. म्हणजे एखाद्या विषयातली संपूर्ण जाणकारी असेलच असे नाही.
कोणताही विषय यांना वर्ज नसतो. अगदी क्रीडा क्षेत्रा पासून राजकारण ते समाजकारण अशा कोणत्याही विषयावर अगदी आत्मविश्वासाने चर्चा करू शकणारी या राशीची मंडळी असतात. शूद्र वर्णाची हि राशी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे काम करण्याची यांची तयारी असते.
एखाद्याला मदत करायला हि मंडळी सदैव तत्पर असतात. बुध हा या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे व्यापारामध्ये सुद्धा हि मंडळी यशस्वी होताना दिसतात.
बुध ग्रहाचा अमल मिथुन राशीवर असल्यामुळे एखादी गोष्ट कशी सादर करावी हे यांच्याकडून शिकण्यासारखं असत. हि मंडळी उत्कृष्ट नकलाकार असतात त्यामुळे नाटक , सिनेमा या क्षेत्रात सुद्धा अगदी लवकर नावारूपाला येताना दिसतात.
मित्रानो जोड्या वर तयार होतात असे म्हटले जाते, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीसाठी दुसऱ्या राशीचे लोक योग्य जीवनसाथी असल्याचे सिद्ध होतात. प्रेमविवाहाच्या बाबतीत जर राशींच्या जुळणीकडे लक्ष दिले गेले तर आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही. जाणून घेऊया मिथुन राशीच्या लोकांसाठी कोणती राशी उत्तम जीवनसाथी ठरते.
मिथुन राशीचे लोक खूप बुद्धीवान असतात आणि त्यांच्या जोडीदाराकडून सुद्धा हे लोक हीच अपेक्षा ठेवतात. यांचे ते हुशार लोकांशी चांगले जुळते आणि ते त्यांच्यासाठी चांगले जीवनसाथी असल्याचे सिद्ध होतात.
हे लोक कोणाशीही सहज मैत्री करतात, पण प्रेमाच्या बाबतीत त्यांना अनेक चढउतारांना सामोरे जावे लागते. मिथुन राशीचे लोक खूप रोमँटिक असतात, त्यामुळे त्यांचे त्यांच्या जोडीदारासोबतचे नाते खूप घट्ट असते.
ज्योतिष शास्त्रानुसार लग्नाच्या बाबतीत मिथुन राशीची जोडी सर्वांसोबत बनत नाही, परंतु कुंभ राशीशी त्यांचे नाते मैत्री आणि प्रेमाचे असते. दोघेही विचारमुक्त, बुद्धीवादी आणि संभाषणात कुशल राशीचे असतात.
कुंभ राशीचे लोक शोधप्रवृत्तीचे असतात तर मिथुन राशीचे लोक अष्टपैलुत्वाने समृद्ध असतात. अशा स्थितीत दोघांचा शोध एकमेकांवर संपतो. हे लोक आपापसातील छोटे-मोठे वाद सहज सोडवतात. हे दोघे एकमेकांशी प्रामाणिक राहतात आणि एकमेकांसोबत चांगली जोडी बनवतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.