नमस्कार मित्रांनो,
मित्रानो आज आपण माहिती घेणार आहोत की, मेष राशीच्या सुनेचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारचे असते, तिचा स्वभाव कसा असतो. तिच्या स्वभावाचे सकारात्मक पैलू, नकारात्मक पैलू या सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत.
सर्वांत आधी आपण हे जाणून घेऊया की सुनेकडून सासरच्या मंडळीना काय गोष्टी अपेक्षित असतात. पहिली गोष्ट म्हणजे घरातील जी काम आहेत ती सुनेला करता यावीत, बाकीच्या चालीरीती सुद्धा त्यांना व्यवस्थित करता यायला हव्यात.
दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्यांचा मान सन्मान करता यायला हवा. त्याचप्रमाणे जे छोटे मंडळी आहेत त्यांच्या गरजांकडे सुद्धा लक्ष असायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे सासरच्या ज्या काही चालीरीती आहेत, कल्चर आहे ते त्या सुनेला सांभाळता यायला हवे. तर अशा प्रकारच्या अपेक्षा सासरच्या मंडळींना सुनेकडून असतात.
या अपेक्षांच्या संदर्भात मेष राशीच्या सुनेचे काय म्हणणे असेल किंवा कशाप्रकारे त्याची पूर्तता करू शकेल, यांच्या स्वभाव संदर्भात व व्यक्तिमत्व याबद्दल माहिती घेउया. मेष राशीच्या स्त्रिया या सरळ मार्गी असतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा प्रचंड असते. यांच्यामध्ये उत्साह ठासून भरलेला असतो.
कोणतीही गोष्ट पटकन झाली पाहिजे, झटपट झाली पाहिजे.आधी कृती मग विचार या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. तिला कोणतेही काम सांगितलं तर ते संपूर्ण शक्तीनिशी पूर्ण करायचं आणि आधी काम करायचं मग शांत बसायचं अशा प्रकारे त्यांचा स्वभाव असतो.
थांबणं, बघू, करू अशा प्रकारच्या गोष्टी नसतात, मग ते काम घरातलं असो किंवा बाहेरचे. ते पटापट पूर्ण करायचे आणि मग शांत बसायचं असा यांचा स्वभाव असतो.
एखादी गोष्ट जर चॅलेंजिंग असेल तर ती करून दाखवायचीच असा त्यांचात गुणधर्म दिसुन येतो. यांच्यांध्ये पेशन्स कमी दिसुन येतात, म्हणजे आधी कोणतीही गोष्ट करायची आणि त्यानंतर विचार करायचा. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. खर्चाचा जास्त विचार करत नाहीत.
एखादी गोष्ट आवडली तर ती करायचीच. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण करणं यांना जमत नाही. या राशीच्या सुना या पारदर्शक असतात. म्हणजेच जे यांच्या मनात असेल तेच यांच्या जिभेवर असते.
जे काही असेल ते स्पष्ट मांडायचा त्यांचा स्वभाव असतो. प्रेम असेल ते ही मनापासून आणि राग असेल तर तो समोरा समोर बोलून दाखवतील. कधी कधी यांचं बोलणं तुम्हाला तिखट वाटू शकतं. त्यांचे हे गुणधर्म तुम्ही समजून घ्यायला हवेत.
यांच्यात आत्मविश्वास खूप जास्त असतो. कोणत्याही गोष्टीला त्या घाबरत नाहीत. या राशीच्या स्त्रियांना चार चौघात अपमान होईल असं काही बोलू नका कारण हे शब्द त्यांना बाणाप्रमाणे लागतात.
त्यामुळे कोणतीही गोष्ट चार चौघात सांगू नका, अस केलं तर या राशीच्या सुना तुम्हाला प्रति उत्तर ही देऊ शकतात. घराचे कल्चर जर समजून सांगायचे असेल तर ते एकांतात सांगा. ज्या वेळेस या सूना चुकलेल्या असतील त्या वेळेस सांगू नका, दोन तीन दिवस थांबा आणि मगच सांगा.
या सूना ती गोष्ट व्यवस्थित समजून घेतील आणि परत तशी चूक करणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या लोकांचा सन्मान, आदर या स्त्रिया करतात पण काय असत की तुम्ही मान दिला तर तुम्हाला मान मिळेल याप्रमाणे त्यांचं मत असतं.
घराच्या बाहेर देखील इन्कम करण्याची तयारी या स्त्रियांची असते. तुम्ही त्यांच्याशी चांगले वागलात तर त्या देखील तुमच्याशी चांगलेच वागतील , बोलतील. असं सुरळीत चाललं तर त्या तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.