मेष राशीची पत्नी : स्वभाव , गुण , अवगुण , प्रेम आणि बरच काही जाणून घ्या…

0
97

नमस्कार मित्रानो

मेष राशी हि राशीचक्रातील पहिली राशी आहे. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून अग्नितत्वाची क्षत्रिय वर्णाची हि राशी आहे. त्यामुळे तडपदार , नेतृत्व , लढाऊपणा आणि स्वभावामध्ये उग्रता हि थोडीशी जास्त प्रमाणात असते. ब्लड प्रेशर , ऍसिडिटी , रक्तदोष असण्याची शक्यता सुद्धा यांच्यामध्ये जास्त असते.

मित्रानो या राशीचे जे चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा. मेंढा हा असा प्राणी आहे जो डोक्याने लढतो. याची सर्व ताकद त्याच्या डोक्याच्या भागामध्ये असते. डोक्याने मारलेली एकच धडक समोरच्याला गार करून टाकते. अगदी तसाच स्वभाव असतो या मेष राशीच्या मंडळींचा.

मित्रांनो मेष राशीच्या स्त्रिया या अगदी चपळ आणि ऍक्टिव्ह असतात. प्रत्येक गोष्ट अगदी चपळाईने आणि त्यात अव्वल येण्याची यांची धडपड असते. एखादी गोष्ट समजली झटपट पूर्ण करायच्या मागे असतात. वेळेच्या मागे राहणे याना पसंद नसते.

मेष राशीच्या महिला स्पष्टपणे बोलणाऱ्या असतात. ओठात एक पोटात एक असे यांचे नसते त्यामुळे कधी कधी बोलताना टोकाची भूमिका घेताना दिसतात. मनात नसताना खोटी खोटी साखर पेरणी करणं या राशीच्या स्त्रियांना जमत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना यांचा राग येतो.

मित्रानो जेवढ्या चपळतेने मेष राशीची बायको काम करते तेवढ्याच चपळतेने नवऱ्याने सुद्धा काम करावे असा तिचा अट्टाहास असतो. बहुदा नवऱ्याचे सुद्धा कुठे काय चुकते , कुठे कमी पडते या बद्दल सुद्धा ती मार्गदर्शन करते.

मित्रानो तुमची बायको मेष राशीची असेल तर तिला नेहमीच असे वाटत असते कि आपल्यापेक्षा आपल्या नवऱ्याने दोन पावलं पुढे असावं. आयुष्याचा जोडीदार निवडताना सुद्धा ती या गोष्टीचा विचार करत असते. मेष राशीच्या पत्नीकडून तुम्हाला नेहमीच मोटिव्हेशन मिळत राहील.

काय करायला हवं ? कस करायला हवं ? कोणाकडून करायला हवं ? जीवनात कशा प्रकारे पुढे जायला हवं ? वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यावा ? या गोष्टी ती तुम्हाला नक्कीच सांगेल पण असे तुम्ही करत नसाल तर त्यांच्या बोलण्याचा स्वर नक्कीच उंचावतो व कठोर आणि तिखट शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडतात.

एखादी गोष्ट आवडली कि मागचा पुढचा विचार न करता टपकन घेऊन टाकायची त्यामुळे काहीवेळेला या थोड्या खर्चिक सुद्धा वाटू शकतात. या महिलांमध्ये उत्साह भयंकर असतो. आधी कृती मग विचार त्यामुळे यांची निर्णय घ्यायची क्षमता खूप चांगली असते.

लक्षात घ्या जरी पैसे खर्च करणारी रास असली तरी करियर करून पैसे कमावण्यात हि रास कधीच मागे हटत नाही. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत त्या ते घेणारच परंतु पैसे कमावण्याची धमक सुद्धा या राशीच्या पत्नीमध्ये असते.

आपल्या कामात परफेक्ट राहणं , इतरांना न जमणारी काम स्वतः पुढाकार घेऊन करणं हे गुण या राशीच्या स्त्रियांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतात. बऱ्याचदा नवऱ्यापेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्या स्त्रिया या मेष राशीच्याच असतात. कारण आयुष्यात नेहमी पुढे जाण्याची धडपड यांची असते.

मेष राशीची पत्नी जरी हाऊस वाइफ असली तरी घरातील काम एकदम चटपटीने करणे , घरात स्वछता ठेवणे , प्रत्येक काम वेळच्या आधी पूर्ण करणे असे गुण दिसून येतात. म्हणजे दुसर्याने आपल्याला दोन शब्द बोलून दाखवता कामा नये.

मेष राशीची पत्नी असलेल्या नवऱ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी कि कुठलीही गोष्ट त्यांना बोलायच्या आधी विचार करा. चार चौघात त्यांच्या बोलण्याला क्रॉस करू नका किंवा त्यांचा शाब्दिक अपमान करू नका. कारण तोच अपमान त्याच वेळी तुमच्याकडे यायला वेळ लागणार नाही.

असे अजिबात गृहीत धरू नका कि पत्नी आहे थोडी माघार घेतली तर काय हरकत आहे ? जिथे मान द्यायला हवा तिथे या राशीच्या पत्नी मान देतात पण ज्या गोष्टी त्यांच्या तत्वात बसत नाहीत तिथे मात्र मान भेटेल याची अपेक्षा ठेवू नका.

विशेष म्हणजे घरात गृहीणी म्हणून काम करण्यापेक्षा यांना बाहेर करियर करणे जास्त आवडत. स्वतःचा असा ठसा उमटवणं यांना चांगलं वाटत. या राशीच्या महिला प्रचंड मनमोकळ्या असतात. स्वयंपाक घरात कापणे , भाजणे , लागणे या गोष्टी यांना कायम होत असतात.

पित्ताचा प्रकार यांच्या मध्ये जास्त असतो. खान्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मित्रांनो पूर्ण विचार केलात तर यांच्या सोबत संसार करणे काही कठीण नाही. छोट्या मोठ्या होतात राहतात आणि त्या असायलाच हव्यात नाही तर नात्यात मजा राहत नाही.

फार काही टोकाला जाण्याचे प्रकार घडणार नाहीत परंतु तुम्हाला तिला समजून घेता आलं पाहिजे. रुसणं , फुगणे झाले तर एकच करा सरळ सरळ माफी मागा. आपण नवरे आहोत , मोठे आहोत असा विचार करू नका. पती पत्नी मध्ये छोटं मोठं असं काही नसत किंबहुना दोघेही सारखेच असतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here